Kolhapur Gold Theft | म्हाकवेत सायंकाळी फिरायला गेलेल्या महिलेचे गंठण लंपास

पती-पत्नी फिरायला गेले असताना गंठण लंपास करण्याची परिसरातील ही पहिलीच घटना आहे
Gold Theft
Gold TheftFile Photo
Published on
Updated on

म्हाकवे : म्हाकवे (ता : कागल) येथील विद्या बापूसो पवार या सायंकाळी साडेसात ते सातच्या दरम्यान पतीसोबत फिरायला गेल्या होत्या. दरम्यान मोटर सायकलवरून आलेल्या चोरट्याने गळ्यातील एक तोळ्याचे गंठण हिसका मारून पोबारा केला. याबाबत कागल पोलिसात नोंद करण्यात आले आहे.

Gold Theft
Drishyam Style Murder | छत्रपती संभाजीनगरमध्ये हत्‍या करुन ‘दृश्यम’ स्टाईल बनाव, ५० लाखांच्या व्यवहारातून निवृत्त प्राध्यापकाला गोळी घालून संपवले!

येथील विद्या पवार व त्यांचे पती बापूसो पवार दोघेजण सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान अनुरकडील रस्त्याकडे फिरायला गेले होते. साडेसहाच्या दरम्यान मोटरसायकल वरून आलेल्या चोरट्याने विद्या यांच्या गळ्यातील गंठणला हिसका मारून आणूरच्या दिशेने पोबारा केला.

Gold Theft
Nanded Murder | हिमायतनगर - बोरगडी तांडा येथे पत्निचा गळा चिरुन खून : पतीनेही घेतला गळफास

पती-पत्नी फिरायला गेले असताना गंठण लंपास करण्याची परिसरातील ही पहिलीच घटना आहे. कागल पोलिसांनी आणूर म्हाकवे येथील सीसीटीव्ही पाहिले असता आणूर येथील सीसीटीव्ही मध्ये दोन चोरटे मोटरसायकलवरून जाताना दिसून आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news