Kolhapur Crime : मित्रांनीच काढला मित्राचा ‌‘काटा‌’

संशयितांना अटक : खुनाची कबुली; सहा दिवसांची कोठडी
Kolhapur Crime New
Kolhapur Crime New
Published on
Updated on

यड्राव : वडिलांना फोनवरून शिवीगाळ व उद्धट बोलल्याच्या रागातून तिघा मित्रांनी मिळून मित्राचा दगडाने ठेचून निर्घृन खून केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली होती. शाहबाज शब्बीर शेख (वय 23, रा. शामरावनगर, सांगली) याची ओळख पटवून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी संशयितांच्या मुसक्या आवळल्या. आसिफ जिलानी यलकुंद्री (28), सोहेल सलीम सनदी (30, दोघे रा. शामराव नगर, सांगली), आकिल इसायली मुजावर (26, रा. कृष्णा नगर, शहापूर) यांना न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायाधीशांनी सहा दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

मृत शहाबाज याच्या इचलकरंजीतील मिळकतीमधील वारसा हिस्सा घेण्याच्या हेतूने शहाबाज व त्याचे तिघे संशयित मित्र दोन दिवसांपासून इचलकरंजी येथेच होते. आसिफ दोन दिवसांपासून बाहेरच असल्यामुळे त्याच्या वडिलांनी शहाबाजकडे फोनवरून विचारणा केली होती. यावेळी त्याने शिवीगाळ करीत उद्धट उत्तर दिले होते. चौघेही नशेत होते. यामुळे या चौघांमध्ये बाचाबाची, भांडण झाले. शाहबाज याने तुम्ही गावाकडे चला तुम्हाला दाखवतो, अशी धमकी दिली होती. याचा राग मनात धरून शहाबाजला तिघा संशयितांनी लक्ष्मीनगर येथील निर्जन स्थळी रात्री रुमालाने गळा आवळून मारण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यात झटापट झाल्यानंतर दगडाने त्याच्या डोक्यात, चेहऱ्यावर ठेचून खून केला. सोशल मीडियाद्वारे मृताची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले, यामुळे तपासाला गती मिळाली.

शहापूर पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी समांतर तपास पथके नेमून तपास सुरू केला. संशयितांना ताब्यात घेत विश्वासात घेऊन त्यांचेकडे चौकशी केली असता, त्यांनी खुनाची कबुली दिली. असे असले तरी खुनासारख्या घटनेला इतके किरकोळ कारण आहे की, आणखी कोणते कारण यामध्ये दडले आहे, याचा तपास पोलिस करीत आहेत. ही कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पो. नि. सुशांत चव्हाण, सपोनि सागर वाघ, प्रशांत निशाणदार, उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकाने केली.

शेतातून संशयिताच्या आवळल्या मुसक्या

गुन्हे अन्वेषण शाखेला संशयित तिघे शाहबाज याची मोटारसायकल घेऊन हातकणंगले परिसरात फिरत असल्याचे समजले. सपोनि सागर वाघ व प्रशांत निशाणदार पथकासह शोध घेत असताना नरंदे गावात संशयित आढळून आले. पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पथकाने पाठलाग केला. सोहेल पळून जाऊन नरंदे येथील शाळूच्या शेतात लपून बसला होता. पथकाने शेताला वेढा दिला आणि सोहेलला शोधून जेरबंद केले. इतर संशयितांनाही शिवारातून ताब्यात घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news