

कोल्हापूर : शहरासह ग््राामीण भागातून दुचाकी चोरणाऱ्या मैत्रिणीसह सराईत गुन्हेगाराला शाहूपुरी पोलिसांनी रविवारी जेरबंद केले. विजय आनंदा जाधव (वय 40), मैत्रीण रेश्मा सुभाष सातपुते (32, रा. बोरवडे, ता. कागल) अशी त्यांची नावे आहेत. दुचाकी चोरीच्या पाच गुन्ह्यांची संशयितानी कबुली दिली आहे. 2 लाख 65 हजार रुपये किमतीची वाहने हस्तगत करण्यात आली आहेत.
जाधव हा सराईत गुन्हेगार असून मैत्रीण रेश्मा सातपुते हिच्यासमवेत कोल्हापूर शहरासह ग््राामीण भागात नवीन, महागड्या दुचाकींची चोरीचा त्याचा फंडा सुरू होता. सीसीटीव्ही फुटेजद्वारे चोरट्यांचा पोलिसांना छडा लागला. पोलिस निरीक्षक संतोष डोके यांच्यासह पथकाने तावडे हॉटेल परिसरात सापळा रचून ताब्यात घेतले. संशयिताकडून वाहन चोरीचे अनेक गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता आहे, असेही डोके यांनी सांगितले.