Kolhapur CPR Hospital : सीपीआरमधील वैद्यकीय बिल घोटाळा; दोषींवर कारवाई अटळ

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती
Kolhapur CPR Hospital
सीपीआरमधील वैद्यकीय बिल घोटाळा; दोषींवर कारवाई अटळ(File photo)
Published on
Updated on

कोल्हापूर : सीपीआरमधील वैद्यकीय बिले घोटाळ्यातील दोषींवर कारवाई अटळ आहे. कोणाचीही गय केली जाणार नाही, अशी स्पष्टोक्ती सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये युद्धजन्य क्षेत्रात अडकलेल्या नागरिकांच्या सुटके संदर्भात आढावा बैठक झाली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात शिवसेना ठाकरे गटाने स्टिंग ऑपरेशन केले होते. यावेळी वैद्यकीय बिलासंदर्भातील ‌‘लाल वही‌’ (रेड रजिस्टर) सापडली. ज्यात कोणाला किती रक्कम दिली, याची नोंद आहे. बिलांच्या फाईल्स मंजूर करण्यासाठी ‌‘सर-मॅडम‌’च्या नावावर लाखो रुपयांची आकडेमोड झाल्याचा पर्दाफाश झाला. या घोटाळ्याशी संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली असून, चौकशी सुरू आहे. यासंदर्भात पुढील कारवाईबाबत विचारले असता पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, चौकशीमध्ये दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. चूक असणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही. लोकांना त्रास देणारा आपल्यासाठी शत्रूच आहे. वैद्यकीय बिलांसाठी आता ‌‘ऑनलाईन‌’ पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.

स्वच्छतागृह पाहिजे, पण आमच्या शेजारी नको

महिला स्वच्छतागृहाबाबत विचारले असता, पालकमंत्री आबिटकर म्हणाले, कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात महिलांसाठी पुरेसे स्वच्छतागृह नाहीत, हे वास्तव आहे. शहरात आता सर्किट बेंच झाल्याने सहा जिल्ह्यांतील लोक येतात. तसेच पर्यटकांचीही संख्या वाढली आहे. त्यामुळे शहरात जिल्हा नियोजन, मनपा निधीतून महिलांसाठी स्वच्छतागृह उभारली जातील. तालुकास्तरावरही स्वच्छतगृह उभारले जातील. जागा निश्चित करून पुढील कार्यवाही केली जाईल; परंतु स्वच्छतागृह पाहिजे, पण आमच्या शेजारी नको, अशी वृत्ती नागरिकांची आहे. हे बदलण्याची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news