Kolhapur News : सीपीआरचे मुख्य प्रवेशद्वार तात्पुरते बंद; अपघात विभागासमोरून प्रवेश

इमारतींचे अंतर्बाह्य सुशोभीकरण सुरू
CPR Hospital
सीपीआर Pudhari File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : सीपीआरचे (छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय) मुख्य प्रवेशद्वार मंगळवारपासून (दि. 7) तात्पुरते बंद करण्यात आले आहे. यामुळे अपघात विभागासमोरून सीपीआर आवारात प्रवेश दिला जाणार आहे. याकरिता हे प्रवेशद्वार खुले करण्यात आले.

सीपीआर आवारात रस्त्यांची दुरुस्ती, ड्रेनेजची कामे, सर्व इमारतींचे अंतर्बाह्य सुशोभीकरण तसेच अन्य दुरुस्तीची कामे सुरू आहेत. या कामांच्या दरम्यान रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून टप्प्याटप्प्याने कामे करण्याचे नियोजन केले आहे. सीपीआरच्या मुख्य कमानीच्या कामाला मंगळवारी सुरुवात करण्यात आली.

यामुळे गोदावरी इमारतीजवळील प्रवेशद्वार तात्पुरते बंद करण्यात आले. गोदावरी गेटचे काम पूर्ण होईपर्यंत अपघात विभागासमोरील गेट रुग्णालयात प्रवेशासाठी खुले ठेवण्यात येणार असून, बाहेर जाण्यासाठी कुंभी गेटचा वापर करण्यात येणार आहे. या कालावधीत रुग्णसेवेत कोणताही निष्काळजीपणा होणार नाही, याची विशेष दक्षता घेतली जाणार असल्याची माहिती राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news