kolhapur Yellow Alert | शहरात पहाटे पावसाची हजेरी; बुधवारी, गुरुवारी ‘यलो अलर्ट’

kolhapur Yellow Alert
kolhapur Yellow Alert | शहरात पहाटे पावसाची हजेरी; बुधवारी, गुरुवारी ‘यलो अलर्ट’File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : कोल्हापुरात गेल्या तीन दिवसांपासून उन्हाचा तडाखा, ढगाळ वातावरण आणि पावसाची हुलकावणी असेच चित्र आहे. रविवारी रात्री शहरात तीनपासून विजांचा कडकडाट सुरू झाला होता. पहाटे चारच्या सुमारास शहरात पावसाच्या मध्यम सरी बरसल्या. हवामान विभागाच्या अहवालानुसार शहरात 6 मि.मी. पावसाची नोंद झाली.

शहरात काही ठिकाणी पावसाची मोठी सर आली, तर काही ठिकाणी मध्यम पाऊस झाला. सुमारे अर्धा तास झालेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते. पावसामुळे दिवसभर ढगाळ वातावरण होते. परिणामी कमाल तापमान घसरून 32 अंशांवर स्थिरावले होते. तर किमान तापमान 22.5 अंशांवर होते. दरम्यान, हवामान विभागाने बुधवार (दि. 27) व गुरुवारी (दि. 28) वादळी पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.

कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात पुढील काही दिवस पूर्व मान्सून पावसासाठी पोषक वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीकडून वाहणारे दमट पश्चिमेकडील वारे सक्रिय असल्याने जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींसह मेघगर्जना होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विशेषतः दुपारनंतर आणि सायंकाळच्या सुमारास वातावरणात ढगांची वाढ होऊन काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळू शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news