Kolhapur water supply | कोल्हापूर शहरातील पाणीपुरवठा आज बंद

उद्याही होणार अपुरा, कमी दाबाने पुरवठा
Kolhapur water supply shutdown
Kolhapur water supply shutdown | कोल्हापूरचा पाणीपुरवठा सोमवारी बंद
Published on
Updated on

कोल्हापूर : महावितरण कंपनीकडून 33 केव्ही लाईनच्या देखभाल दुरुस्तीचे कामकाज सोमवारी (दि. 30) हाती घेण्यात येणार आहे. यामुळे विद्युत पुरवठा बंद राहणार असल्याने पाणी उपसा होऊ शकणार नाही. त्यामुळे शहरातील ए, बी, सी, डी व ई वॉर्ड त्यास संलग्नित उपनगरे, ग्रामीण भागातील नळ कनेक्शन धारकांना सोमवारी होणारा पाणीपुरवठा बंद राहील. तसेच मंगळवारीही अपुरा व कमी दाबाने पुरवठा होणार आहे.

लक्षतीर्थ वसाहत, संपूर्ण फुलेवाडी रिंग रोड, साने गुरुजी वसाहत, राजे संभाजीनगर, क्रशर चौक, आपटेनगर टाकी परिसर, राजोपाध्येनगर, कणेरकरनगर, क्रांतिसिंह नाना पाटील नगर, तुळजाभवानी कॉलनी, देवकर पाणंद, टेंबे रोड, शिवाजी पेठ,चंद्रेश्वर गल्ली, तटाकडील तालीम परिसर, साकोली कॉर्नर, उभा मारुती चौक, बिनखांबी गणेश मंदिर परिसर, महाद्वार रोड, मंगळवार पेठ काही भाग, संपूर्ण सी, डी वॉर्ड अंतर्गत दुधाळी, गंगावेश, उत्तरेश्वर पेठ, शुक्रवार पेठ, ब्रह्मपुरी, बुधवार पेठ तालीम परिसर, सिद्धार्थनगर, पापाची तिकटी, लक्ष्मीपुरी, शनिवार पेठ, सोमवार पेठ, ट्रेझरी ऑफिस, बिंदू चौक, कॉमर्स कॉलेज परिसर, आझाद चौक, उमा टॉकीज, महालक्ष्मी मंदिर परिसर, गुजरी, मिरजकर तिकटी, देवल क्लब, ई वॉर्ड अंतर्गत खानविलकर पेट्रोल पंप परिसर, शाहूपुरी, कुंभार गल्ली व बागल चौक परिसरात पाणी पुरवठा होणार नाही, असे प्रशासनाने कळविले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news