

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या (महावितरण) वतीने काळम्मावाडी 33 केव्ही उपकेंद्र येथे आयसोलेटर बसविण्याचे काम सोमवारी (दि. 19) व मंगळवारी (दि. 20) हाती घेण्यात येणार आहे. या कालावधीत विद्युत पुरवठा बंद राहणार असल्याने काळम्मावाडी पाणीपुरवठा योजनेतून कोल्हापूर शहरास होणारा पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे.
शहरास पर्यायी पाणीपुरवठा करण्यासाठी शिंगणापूर, बालिंगा व नागदेववाडी येथील पंपिंग स्टेशनमधून पाणीपुरवठा सुरू ठेवण्यात येणार आहे. मात्र या व्यवस्थेमुळे शहरातील पाणीपुरवठा अपुरा तसेच कमी दाबाने होण्याची शक्यता आहे. बुधवारी (दि. 21) पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
या कालावधीत ए व बी वॉर्ड तसेच त्यास संलग्न उपनगरे व ग्रामीण भाग, लक्षतीर्थ वसाहत, संपूर्ण फुलेवाडी रिंगरोड, साने गुरुजी वसाहत, राजे संभाजीनगर, क्रशर चौक, आपटेनगर टाकी परिसर, राजोपाध्येनगर, कणेरकरनगर, क्रांतिसिंह नाना पाटील नगर, तुळजाभवानी कॉलनी, देवकर पाणंद, टेंब्ये रोड, शिवाजी पेठ, चंद्रेश्वर गल्ली, तटाकडील तालीम परिसर, साकोली कॉर्नर, उभा मारुती चौक, बिनखांबी गणेश मंदिर परिसर, महाद्वार रोड, मंगळवार पेठेतील काही भाग, दुधाळी, गंगावेश, उत्तरेश्वर पेठ, शुक्रवार पेठ, ब—ह्मपुरी, बुधवार पेठ तालीम परिसर, सिद्धार्थनगर, पापाची तिकटी, लक्ष्मीपुरी, शनिवार पेठ, सोमवार पेठ, ट्रेझरी ऑफिस परिसर, बिंदू चौक, कॉमर्स कॉलेज परिसर, आझाद चौक, उमा टॉकीज परिसर, महालक्ष्मी मंदिर परिसर, गुजरी, मिरजकर तिकटी, देवल क्लब व त्यास संलग्न उपनगरे व ग्रामीण भाग, तसेच ई वॉर्डमधील कसबा बावडा, रमणमळा, ताराबाई पार्क, कदमवाडी, भोसलेवाडी, शिवाजी पार्क, रुईकर कॉलनी, बापट कॅम्प, राजीव गांधी वसाहत, लोणार वसाहत, लिशा हॉटेल परिसर, महाडिक वसाहत, टेंबलाईवाडी, माळी कॉलनी, साईक्स एक्स्टेन्शन, राजारामपुरी 1 ली ते 13 वी गल्ली, मातंग वसाहत, यादवनगर, उद्यमनगर, शास्त्रीनगर, राजारामपुरी एक्स्टेन्शन, टाकाळा, पांजरपोळ, सम—ाटनगर, प्रतिभानगर, दौलतनगर, शाहूनगर, राजेंद्रनगर, इंगळे मळा परिसर, वैभव सोसायटी, शांतिनिकेतन, ग्रीन पार्क परिसर, शाहुपुरी पहिली ते चौथी गल्ली, व्यापार पेठ आदी भागांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून कोल्हापूर महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.