

कोल्हापूर ः शहरवासीयांना गुरुवारपासून (दि. 30) दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाला. त्यामुळे निम्म्या शहराला पाणी मिळाले नाही. तीव उन्हामुळे काळम्मावाडीतील पाणीसाठा घटत असल्यामुळे धरणातील उपलब्ध पाणी पावसाळा सुरू होईपर्यंत काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.
1 मे रोजी या भागात पाणीपुरवठा - सी व डी वॉर्ड - चंबुखडी जलशुद्धी केंद्रातून वितरीत होणारा सलग्न भाग, आझाद गल्ली, मटण मार्केट, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी 5 ते 8 वी गल्ली, कामगार चाळ, सुभाष रोड, चांदणी चौक, रविवार पेठ, सुतार वाडा, अकबर मोहल्ला, महाराणा प्रताप चौक, कुंभार गल्ली, भवानी मंडप, सब जेल परिसर, मिरजकर तिकटी, महालक्ष्मीनगर, टेंबे रोड, सावित्रीबाई फुले दवाखाना, महाद्वार रोड, बिनखांबी गणेश मंदिर, निवृत्ती चौक, उभा मारुती चौक, बह्मेश्वर बाग, तटाकडील तालीम, चंद्रेश्वर, फुलेवाडी, रंकाळा टॉवर परिसर, शिवाजी पेठ (काही भाग), गुजरी, दत्त गल्ली, लक्ष्मी गल्ली, गंगावेस, दुधाळी, पंचगंगा रोड, लोणार चौक, पापाची तिकटी, बुरूड गल्ली, सोन्या मारुती चौक, शिपुगडे तालीम, पिवळा वाडा, सिद्धार्थनगर, बह्मपुरी, उत्तरेश्वर, लक्षतीर्थ, बलराम कॉलनी आदी. नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने पत्रकाद्वारे केले आहे.