Kolhapur Circuit Bench | मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा उद्या दिमाखदार वर्षपूर्ती सोहळा

माजी सरन्यायाधीश भूषण गवई, उच्‍च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची प्रमुख उपस्थिती
कोल्हापूर: मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या स्थापनेला दि. १८ ऑगस्ट रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. गेल्या अनेक वर्षांच्या संघर्षातून साकारलेल्या या सर्किट बेंचच्या वर्षपूर्तीचा सोहळा रविवारी (दि.१६) होत आहे. या पार्श्वभूमीसह स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्किट बेंचच्या इमारतीला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या रोषणाईने वर्षपूर्तीच्या झगमगाटात इमारतीचे सौंदर्य आणखी खुलले आहे.
कोल्हापूर: मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या स्थापनेला दि. १८ ऑगस्ट रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. गेल्या अनेक वर्षांच्या संघर्षातून साकारलेल्या या सर्किट बेंचच्या वर्षपूर्तीचा सोहळा रविवारी (दि.१६) होत आहे. या पार्श्वभूमीसह स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्किट बेंचच्या इमारतीला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या रोषणाईने वर्षपूर्तीच्या झगमगाटात इमारतीचे सौंदर्य आणखी खुलले आहे. (छाया : मिलन मकानदार)
Published on
Updated on

कोल्‍हापूर : मुंबई उच्‍च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या वर्षपूर्तीचा दिमाखदार सोहळा रविवारी (दि. १६) शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षान्‍त सभागृहात सकाळी ११ वाजता होत आहे. भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई, मुंबई उच्‍च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र व्ही. घुगे यांच्यासह उच्‍च न्यायालयातील १८ न्यायमूर्ती, सर्किट बेंचमधील विद्यमान, तसेच तीन निवृत्त न्यायमूर्ती अशा एकूण २५ न्यायमूर्तींसह ६ जिल्ह्यांतील बार असोसिएशनचे पदाधिकारी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. राजेंद्र मंडलिक, महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलचे सदस्य ॲड. विवेक घाटगे यांनी शुक्रवारी पत्रकारांना माहिती दिली. खासदार शाहू महाराज, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग, महाधिवक्ता डॉ. मिलिंद साठे या मान्यवरांसह कोल्हापूर, सांगलीसह सहा जिल्ह्यांतील बार असोसिएशन अध्यक्ष, तालुका अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.

कोल्हापूर खंडपीठ ॲक्शन कमिटी, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र-गोवा, बाॅम्बे हायकोर्ट कोल्हापूर खंडपीठ बार असोसिएशन ॲडहॉक समितीमार्फत माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांचा शाल, श्रीफळ, मानपत्र देऊन गौरव करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

गेट क्रमांक ६ आणि ८ मधून प्रवेश

सहा जिल्ह्यांतून बार असोसिएशनचे पदाधिकारी, वकील, पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. सर्वांना शिवाजी विद्यापीठ गेट क्रमांक ६ आणि ८ मधून प्रवेश दिला जाणार आहे, असे ॲड. घाटगे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news