कोल्हापूर : कोल्हापूरचे टोल आंदोलन, ऊसदर प्रश्नापासून ते खंडपीठ लढ्यास दै. ‘पुढारी’ने बळ दिले आहे. कोल्हापूरच्या विकासात ‘पुढारी’चे मोठे योगदान आहे, असे गौरवोद्गार सेंट झेवियर्स माजी विद्यार्थी संघाच्या (झेसाकॉप) पदाधिकार्यांनी काढले.
कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच झाले आहे. यात दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे योगदान आहे. यानिमित्त सेंट झेवियर्स माजी विद्यार्थी संघाच्या पदाधिकार्यांनी मंगळवारी सकाळी डॉ. जाधव यांची दै.‘पुढारी’ मुख्य कार्यालयात भेट घेऊन अभिनंदन केले. याप्रसंगी फादर अँड्रयू, फादर फ्रान्सिस यांच्यासह सेंट झेवियर्स माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष व डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, दिलीप मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी डॉ. जाधव यांनी सेंट झेवियर्स स्कूलच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच खंडपीठ, सियाचीन हॉस्पिटल उभारणीबाबत माहिती दिली. ते म्हणाले, कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच झाल्याने शहराचा मोठा कायापालट होणार आहे. खंडपीठामुळे सर्वच क्षेत्राला याचा फायदा होणार आहे.
दै.‘पुढारी’ व कोल्हापूरच्या जनतेने सियाचीन येथे उभारलेले हॉस्पिटल जवानांसाठी संजीवनी ठरत असून, आजवर 8 लाखांहून अधिक सैन्यातील जवानांवर उपचार झाले असल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले. यावेळी माजी विद्यार्थी संघाचे संचालक राजू लिंग्रस, प्रसाद कामत, दीपक पाटील-किणीकर, प्रवीण सोळंकी, ऋत्विक सोळंकी, प्राचार्य डॉ. बाबासाहेब उलपे, सेंट झेवियर्स स्कूलचे उपप्राचार्य अँथनी डिसुझा, सचिव रोझी आदी उपस्थित होते.