

सैनिक टाकळी, पुढारी वृत्तसेवा : अत्याचाराच्या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली असून त्याच्या निषेधार्थ विविध ठिकाणी विविध प्रकारची आंदोलने करण्यात येत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील अकिवाट येथील चिमुकले रस्त्यावर येत उद्रेक फेरी काढली. (Kolhapur News)
बदलापूर, नाशिक, अकोला व कोल्हापूर जिल्ह्यात कोवळ्या मुलींच्यावर झालेल्या लैगिक अत्याचाराच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्ह्यातील अकिवाट येथील ग्रामपंचायत चौकात सिद्धिविनायक तरुण मंडळातर्फे उद्रेक फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये चिमुकल्यानी गावातून मेणबत्ती पेटवून मूक फेरी काढली. नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी, दोषींवर कार्यवाही करावी या मुलींच्या मागण्यांसाठी सिद्धिविनायक तरुण मंडळातर्फे गावातील प्रमुख नेतेमंडळींच्या मार्गदर्शनाखाली उद्रेक फेरीचे आयोजन करण्यात आले.
बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशी झालीच पाहिजे, नराधमाला शिक्षा झालीच पाहिजे, महिला, मुलींची सुरक्षा करणार कोण? अशा आशयाचे फलक घेऊन या उद्रेक फेरीमध्ये विद्यार्थी - विद्यार्थिनी सहभागी झाले होते. गावातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत, तरुण तरुणी आणि जेष्ठ ग्रामस्थांनीही या उद्रेक फेरीत सहभाग नोंदवला. सदरची फेरी ग्रामपंचायत - स्टँड - वखार - कागे वेस - व्हरायटी गल्ली - वंदे मातरम् चौक - अंगडी व्हळी - स्टँड अशी फेरी काढण्यात आली. फेरीच्या सांमारोपा वेळी आदरांजली वाहण्यात आली.
मान्यवरांच्या मनोगतामध्ये विद्यार्थी, विद्यार्थिनीं,आई, वडिलांनी काय करावे. काय करू नये. याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामपंचायती तर्फे कोणत्या उपाय योजना राबवल्या जातील. त्याचाही खुलासा यावेळी करण्यात आला. यावेळी सिध्दीविनायक तरूण मंडळाचे सर्व सदस्य, ग्रामपंचायत सदस्या, शितळ हळिंगळे, बाळसिंग रजपूत, रशिद मुल्ला, निलेश तवंदकर, प्रशांत बिरनाळे,संदिप नरवाडे,श्रीराम हुजरे, युवराज लाटवडे ,सौरभ पाटील आशा सेविका, विद्यार्थी विद्यार्थीनी आदी उपस्थित होते.