

Warna river flood warning
बांबवडे : वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शुक्रवार (दि.26) पासून सुरू असलेल्या संततधारेमुळे पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे धरणाची पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी आज (दि. 27) दुपारी 1.00 वाजल्यापासून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
या अंतर्गत वक्र दरवाजामधून 3,479 क्युसेक व विद्युत गृहातून 1,630 क्युसेक, असा एकूण 5,109 क्युसेक पाणी वारणा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. पावसाचे प्रमाण कायम राहिल्यास किंवा वाढल्यास, विसर्गामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या सर्व गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.