Kolhapur Crime : पोलिसांची कॉलर पकडली; सचिन चव्हाण यांच्यासह पुत्रावर गुन्हा

मोटार जप्त, दोघेही ताब्यात; रंकाळ्याजवळ घटना
Crime News
Crime NewsPudhari
Published on
Updated on

कोल्हापूर : पोलिस गस्ती पथकातील अधिकारी, पोलिसांच्या अंगावर धावून जात कॉलर पकडत आरेरावी करुन भरचौकात शिवीगाळ केल्याप्रकरणी काँग््रेासचे शहराध्यक्ष, महापालिका स्थायी समिती माजी अध्यक्ष सचिन प्रल्हाद चव्हाण यांच्यासह पुत्र चंद्रसेन चव्हाण (रा. लाड चौक, शिवाजी पेठ) यांच्याविरुद्ध जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी चव्हाण पिता-पुत्रांना ताब्यात घेतले आहे. संशयितांकडून आलिशान मोटारही हस्तगत करण्यात आली आहे.

रंकाळा तलावासमोरील फिटनेस सेंटर व टिंबर मार्केट प्रवेशद्वारासमोर सोमवारी रात्री हा प्रकार घडला. कॉन्स्टेबल सचिन दादू कुंभार यांनी राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिस निरीक्षक किरण लोंढे यांनी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

याबाबतची माहिती अशी, सोमवारी रात्री गस्ती पथकातील पोलिस निरीक्षक लोंढे व अन्य पोलिस रंकाळा तलावासमोरील चेंज मी फिटनेस सेंटर येथे गस्त घालत असताना काही तरुण आरडाओरड करीत असल्याचे दिसले. यावेळी पोलिस निरीक्षक लोंढे तरुणांना समजावत होते. यावेळी चंद्रसेन चव्हाण याने, तुम्हाला काय करायचे ते करा, असे उर्मटपणे बोलत पथकातील अधिकारी, पोलिसांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. अन्य पोलिसांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने कॉलर धरून शिवीगाळ केली. मी कोण आहे? माझा बाप कोण आहे माहीत आहेत का, अशी दुरुत्तरे करीत बघून घेण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पोलिसांची मोटार अडवली

चंद्रसेनला मोटारीतून पोलिस ठाण्याच्या दिशेने नेत असताना सचिन चव्हाण यांनी पोलिसांची मोटार अडवून अधिकारी, पोलिसांशी वाद घातला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news