Kolhapur car accident |निलेवाडी-ऐतवडे खुर्द पुलाचा कठडा तोडून कार थेट वारणा नदीपात्रात कोसळली; चालक जखमी

वारणा नदीवरील निलेवाडी-ऐतवडे खुर्द पुलावरुन कठडा तोडून कार थेट नदी पात्रात कोसळली, चालक जखमी
Kolhapur car accident
Kolhapur car accident
Published on: 
Updated on: 

वारणानगर : कोल्हापूर आणि सांगली जिल्हें जोडणाऱ्या वारणा नदीवरील निलेवाडी - ऐतवडे खुर्द पुलावरुन कठडा तोडून कार थेट नदीत कोसळली. यामध्ये चालक जखमी झाला असून कारचे मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात पहाटे सहाच्या सुमारास झाला. या घटनेची नोंद कुरळप पोलीस ठाण्यात झाली आहे. पृथ्वीराज चौगले (अमृतनगर, ता. पन्हाळा) असे जखमीचे नाव आहे.

Kolhapur car accident
Kolhapur |ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारे बंडा पाटील रेठरेकर आजारी; उपचारासाठी मदतीचे आवाहन

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी - ऐतवडे खुर्द हून निलेवाडी अमृतनगरकडे कार (एम.एच.०९-९४९५ ) निघाली होती. वारणा नदीवरील ऐतवडे - निलेवाडी पुलावर कार येताच सुरवातीला लोखंडी संरक्षण कठडे तोडून सुमारे वीस फूट पात्राशेजारी कोसळली. सुदैवाने कारमधील एअर बॅग उघडल्याने चालक बचावला. कार कोसळल्यानंतर झालेल्या आवाजामुळे लोकांनी घटनास्थळाकडे धाव घेवून जखमीला बाहेर काढून रुग्णालयात नेले.

Kolhapur car accident
kolhapur | महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे १८०० कर्मचाऱ्यांचे भविष्य अंधारात!

या अपघातात कारच्या समोरील मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. अपघात नेमका कशामुळे झाला आणि वाहनातील अन्य लोकांची स्थिती काय आहे, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. ही कार सरला हंबीरराव मोहिते यांच्या नावे आहे. अधिक तपास कुरळप पोलीस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news