कोल्हापूर : पुलावरून कार कोसळून भीषण अपघात; कारचालक ठार

Kolhapur Accident : बुबनाळ येथील घटना
Kolhapur Accident News
पुलावरून कार कोसळून झालेल्या अपघातात कारचालकाचा मृत्यू झाला.
Published on
Updated on

कुरुंदवाड : बुबनाळ (ता. शिरोळ) येथे कारवरील ताबा सुटल्याने ती पुलावरून थेट खाली कोसळली. या भीषण अपघातात एक युवक जागीच ठार झाला. सौरभ राजू चव्हाण (वय २५, रा. आसरा नगर, गल्ली नं. १, इचलकरंजी, ता. हातकणंगले) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. कारमधील दोघेजण जखमी आहेत. हा अपघात दुपारी साडेचारच्या सुमारास घडला. जखमींवर इचलकरंजी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सौरभ चव्हाण हा आपल्या दोन मित्रांबरोबर कार क्र(एम.एच ०९ एफ.बी.६९९३) मधून कवठेगुलंदहुन औरवाडच्या दिशेने येत होता. बुबनाळ हद्दीतील हॉटेल सीजन फॉरच्या लगत असणाऱ्या साकव पुलाजवळ त्याचा कारवरील ताबा सुटल्याने कार थेट पुलावरून खाली कोसळली. हा अपघात इतका भीषण होता की, कार पलटी होऊन पुलाखाली कोसळ्याने कारचालकाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news