Theft
TheftPudhari

Kolhapur Theft News: तेरवाडमधील घरफोडीत 4.67 लाखांचा ऐवज लंपास; एक ताब्यात

शटर उचकटून मेडिकल दुकानातील 2 लाख 25 हजार रुपये रोख व सीसीटीव्ही कॅमेरा चोरून नेला
Published on

कुरुंदवाड : तेरवाड (ता. शिरोळ) येथील गणेशनगर परिसरात रविवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून मेडिकल दुकानातील 2 लाख 25 हजार रुपये रोख व सीसीटीव्ही कॅमेरा चोरून नेला.

याच दरम्यान, लालनगर परिसरात नाजुका गणपती गोसावी यांच्या बंद घराचे कुलूप उचकटून घरातील 2 लाख रुपये रोख तसेच सुमारे 41 हजार रुपये किमतीची पितळी व तांब्यांची भांडी लंपास केली. दोन ठिकाणी झालेल्या चोरीच्या घटनांमध्ये रोख रक्कम व मौल्यवान वस्तूंसह एकूण 4 लाख 67 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. ही घटना रविवारी (दि. 18) मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून सोमवारी सकाळी चोरीचा प्रकार उघडकीस आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news