

कोल्हापूर ः शहर व जिल्ह्यात ब्राऊन शुगरसह गांजाची तस्करी करणार्या संघटित टोळ्यांसह तस्करीप्रकरणी दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या सराईतांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण मोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी गुरुवारी दिली. ही मोहीम आणखी तीव— करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.
अलीकडच्या काळात सीमा भागासह अन्य राज्यांतून गांजासह ब—ाऊन शुगर, एमडी पावडरची जिल्ह्यात तस्करी होऊ लागली आहे. कोवळ्या वयातील शाळकरी मुलेही अमली व्यसनाच्या आहारी जाऊ लागली आहेत. त्यामुळे ब—ाऊन शुगरसह गांजा तस्करीविरोधी शहर, जिल्ह्यात कारवाईची व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. शहरातील चारही पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकार्यांसह जिल्ह्यात याबाबत सक्त सूचना देण्यात आले आहेत. अजिबात खंड पडणार नाही याची दक्षता घेण्यात आले आहे.
ब—ाऊन शुगर आणि गांजा तस्करीचे 77 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये अमली पदार्थ बाळगणार्या संशयितांची संख्या 20 वर पोहोचली आहे. अमली पदार्थ तस्करीप्रकरणी आजवर 108 तस्करावर कारवाईचा बडगा उभारण्यात आला आहे, असेही पोलिस अधीक्षकांनी सांगितले छापा सत्र कारवाईत 35 लाख 5 हजार 539 रुपये किमतीचा 123 किलो 820 ग्रॅम गांजा हस्तगत करण्यात आला आहे याशिवाय दहा हजार रुपये किमतीची ब—ाऊन शुगर, एमडी पावडरही हस्तगत करण्यात आली आहे, असेही पोलिस अधीक्षक पंडित यांनी सांगितले.
ब—ाऊन शुगर आणि गांजा तस्करी प्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी कठोर कारवाईची भूमिका हाती घेतली आहे. अमली पदार्थ तस्करीप्रकरणी दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या तस्करांवर कठोर कारवाई केली जात आहे. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत त्यांच्यावर मोका कारवाई केली जाणार आहे, असेही पोलीस अधीक्षकांनी सांगितले. शहरासह जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून कारवाईची मोहीम अधिक तीव—पणे राबविण्यात येत आहे अधिकार्यासह कर्मचार्यांनाही याबाबत सक्त सूचना देण्यात आले आहेत जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांतर्गत अधिकार्याकडून गेल्या आठ दिवसांत झालेल्या कारवाईचा आढावा मागविण्यात आला आहे त्यामध्ये किती संशयितांवर किती गुन्हे दाखल झाले आहेत, याची तत्काळ पडताळणी करण्यात येईल आणि त्यानंतर मोका अंतर्गत कारवाईचे प्रस्ताव तातडीने मागविण्यात येतील, असेही त्यांनी त्यांनी सांगितले. कुख्यात अमली पदार्थ आणि शस्त्रास्त्र तस्कर मनीष नागोरी याच्यावर लवकरच कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले
ब—ाऊन शुगर, गांजा तस्करी अथवा नशेची झिंग आणणार्या गोळ्यांची विक्री होत असल्यास नागरिकांनी संबंधित पोलिस ठाणे अथवा पोलिस मुख्यालय कार्यालयाशी संपर्क साधून माहिती द्यावी. संबंधितांची नावे गोपनीय ठेवण्यात येतील, असेही त्यांनी आवाहन केले.