Migratory Birds: भुदरगडच्या डोंगररांगांमध्ये हिवाळी 'आफ्रिकी' पाहुण्यांचे आगमन

आफ्रिकेतून आलेला जांभळा बगळा ठरतोय पक्षीप्रेमींसाठी खास आकर्षण!
Migratory Birds
कोल्‍हापूर जिल्ह्यातील भुदरगडच्या डोंगररांगांमध्येही स्थलांतरित पक्षी दाखल झाले आहेत. यामध्ये आफ्रिकेतील जांभळ्या बगळ्याचाही समावेश आहे.
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : राज्यात थंडीची चाहूल लागताच दरवर्षीप्रमाणे यंदाही परदेशी स्थलांतरित पक्ष्यांचे (Migratory Birds) आगमन झाले आहे. विविध देशांतून हजारो मैलांचा प्रवास करून आलेले हे हिवाळी पाहुणे पक्षीप्रेमींच्या आकर्षणाचे केंद्र ठरतात. हे स्थलांतरित पक्षी आपल्याकडील निसर्गाचे वैभव वाढवतातच, स्थानिक जैवविविधतेसाठीही महत्त्वाचे ठरतात. जिल्ह्यातील भुदरगडच्या डोंगररांगांमध्येही स्थलांतरित पक्षी दाखल झाले आहेत. यामध्ये आफ्रिकेतील जांभळ्या बगळ्याचाही समावेश आहे.

आफ्रिकेतून आलेल्या जांभळ्या बगळ्याचे दर्शन

स्थलांतरित पक्षी भुदरगडच्या डोंगररांगांमध्ये दाखल झाले आहेत. यावर ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुभाष के. देसाई यांनी फेसबुक पोस्ट केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, "डॉक्टर राहुल दड्डीकर, डॉक्टर सदलगे नेहमीच सकाळी पाच ते साडेसात फिरायला जातो. पाणथळ भाग भरपूर आहे. अशा ठिकाणी आम्हाला आठ-पंधरा दिवसाला थंडीच्या दिवसात नवीन पक्षी दिसतात. आज सकाळी सहाच्या दरम्यान शिंदेवाडी जवळच्या एका पाण्याच्या 'खाणी'जवळ एक वेगळाच, लांबच लांब मानेचा उंच पक्षी दिसला आणि त्याचा शोध घेताना आफ्रिकेतून जांभळा बगळा असल्याचे स्पष्ट झाले."

Migratory Birds
Migratory Crabs Research : गोड्या पाण्यातील खेकडेही करतात स्थलांतर! संशाेधक जाणून घेणार कारण

पाणथळ जागांमध्ये आढळणारा जांभळा बगळा

आफ्रिकेतील जांभळा बगळा हा मोठा, पाणथळ प्रदेशात दिसणारा पक्षी महाराष्ट्रातील पाणथळ जागांमध्ये आणि पाण्याजवळील परिसरात सामान्यपणे आढळतो. याच्या अंगावर जांभळट-तांबूस रंगाचे पिसे असतात, पंख करड्या (slate grey) रंगाचे असतात आणि छातीवर लालसर-तपकिरी (rufous brown) छटा दिसते. ही प्रजाती आफ्रिका, मध्य आणि दक्षिण युरोप तसेच दक्षिण आणि पूर्व आशिया या प्रदेशांत प्रजनन करते. युरोपियन आणि इतर आशियाई पक्षीसंख्या स्थलांतरित असून, हिवाळ्यात अनुक्रमे आफ्रिका व आशियाच्या अधिक दक्षिणेकडील भागात स्थलांतर करतात, असेही डॉ. सुभाष देसाई यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

image-fallback
स्थलांतरित पक्ष्यांना वातावरणाच्या बदलाचा फटका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news