Kolhapur Crime : भेंडवडेतील खून सख्ख्या भावाकडूनच

कौटुंबिक वादातून कृत्य : संशयितास अटक; तीन दिवस पोलिस कोठडी
Kolhapur Crime News
भेंडवडेतील खून सख्ख्या भावाकडूनच
Published on
Updated on

पेठवडगाव : हातकणंगले तालुक्यातील भेंडवडे येथे दारूच्या नशेत सुरू असलेल्या कौटुंबिक वादातून आणि सततच्या त्रासाला कंटाळून लहान भावाने मोठ्या भावाचा खून केला. अमर बापूसो चव्हाण (वय ३३) असे मृताचे नाव असून, किशोर बापूसो चव्हाण याच्याविरुद्ध वडगाव पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, किशोर चव्हाण याला बुधवारी न्यायालयात हजर केले असता त्याला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मृताची पत्नी पियुषा अमर चव्हाण (वय ३०) यांनी फिर्याद दिली.

मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास त्याने पुन्हा अतिमद्यप्राशन करून किशोरच्या घराच्या दरवाजावर लाथा मारत आणि कुऱ्हाडीने प्रहार करत आरडाओरड सुरू केली. संतापलेल्या किशोरने ‘तू रोज रोज त्रास देतोस, तुला आता जिवंतच ठेवत नाही,’ असे म्हणत अमरच्या पोटात सुरीने वार केला. अमरला पोलिसांनी रुग्णालयात हलवले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. अमर यांच्या मागे पत्नी, दोन लहान मुली व वृद्ध आई-वडील असा परिवार आहे. पोलिस निरीक्षक गोरख चौधर अधिक तपास करीत आहेत.

जयसिंगपूर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर आणि वडगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गोरख चौधर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संदीप पाटील व पथकाने किशोर चव्हाणला अटक केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news