Kolhapur Crime : स्पर्धा परीक्षेतील अपयशाने भामटेत तरुणीने संपविले जीवन

रेल्वे परीक्षेत दोन मार्कात आलेल्या अपयशामुळे उचलले टोकाचे पाऊल
Kolhapur Crime News
स्पर्धा परीक्षेतील अपयशाने भामटेत तरुणीने संपविले जीवन
Published on
Updated on

कोल्हापूर : स्पर्धा परीक्षेत अपयश आल्यामुळे तरुणीने सोमवारी (दि. २१) जनावरांच्या गोठ्यात गळफास घेऊन जीवन संपविले. वैष्णवी रामचंद्र पाटील (वय २३, रा. भामटे, ता. करवीर) असे तिचे नाव आहे. वैष्णवी दोन वर्षांपासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होती. दोन महिन्यांपूर्वी रेल्वेच्‍या परीक्षेत दोन मार्कात आलेल्या अपयशामुळे काही दिवसांपासून ती नैराश्यात असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.

वैष्णवीने बी.कॉम.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. वडील शेती तर आई घरकाम करते. दोन वर्षांत तिने विविध परीक्षा दिल्या. मात्र, तिला अपयश येत होते. तिने रेल्वेची परीक्षा दिली. यामध्ये तिला अपयश आले. यामुळे ती नैराश्यात होती. सोमवारी रात्री वैष्णवीने गळफास घेतल्याचे दिसले. नातेवाईकांनी वैष्णवीला बेशुद्धावस्थेत सीपीआरमध्ये दाखल केलेे. मात्र, उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पोलिस अंमलदार शशिकांत पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news