

दोनवडे : बालिंगा-दोनवडे या दोन्ही गावांमधील नवीन भोगावती पुलावर स्लॅब टाकण्याचे काम मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सुरूच होते. त्यामुळे कोल्हापूर-गगनबावडा मार्ग बंद असून, कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक वेगवेगळ्या मार्गाने वळविली आहे.
कोल्हापूर-गगनबावडा मार्गाचे काम गेली तीन वर्षे सुरू आहे, अद्याप ते पूर्ण झालेले नाही. कळे ते कोल्हापूर या रस्त्याचे अर्धवट काम झालेले आहे. दोनवडे ते बालिंगे हा रस्ता गेली तीन वर्षे खड्ड्यातच आहे. अनेकांची हाडे व मनके या रस्त्यामुळे खिळखिळे झाले आहेत. आता या पुलाचे काम पूर्णत्वावर आले आहे. त्यामुळे लोकांच्या अशा पल्लवित झाल्या आहेत.