Kolhapur News : बालकल्याण संकुलातील नऊ मुली घेतल्या दत्तक

मेतकेतील बाळुमामा संस्थानचे सेवेचे पाऊल; गावातील जि.प. शाळेतही नेमले पाच शिक्षक
Kolhapur News
कोल्‍हापूर : बालसंकुलमधील दत्तक मुलींच्या खर्चाचा धनादेश बालसंकुलच्या अधिकाऱ्यांकडे देताना पापा पाटील, राजेंद्र पाटील. सोबत पद्मजा तिवले व इतर मान्यवर.
Published on
Updated on

हमीदवाडा : कर्मयोगी संत सद्‌गुरू बाळुमामा यांचे मूळ क्षेत्र म्हणून ख्याती असलेल्या मेतके (ता. कागल) येथील सद्‌गुरू बाळुमामा चॅरिटेबल ट्रस्टने सेवेच्या व ज्ञानाच्या प्रांतात पाऊल टाकले आहे. कोल्हापूर येथील अनाथ बाल कल्याण संकुलातील नऊ अनाथ मुलींना संस्थानने दत्तक घेतले आहे, तर मेतके गावातील जिल्हा परिषद शाळेला बळ देत तेथे संस्थानने पाच शिक्षक नेमले आहेत.

मुख्य रस्त्यापासून आडमार्गाला असलेल्या चिकोत्रा काठावरील मेतके येथील स्वतः मामांनी स्थापन केलेल्या मंदिराचा ट्रस्ट २००५ मध्ये स्थापन झाला. त्यानंतर मंदिर, प्रशस्त भक्तनिवास व अन्नछत्र याची उभारणी केली. आता धार्मिक कार्याबरोबर संस्थानने अनाथ मुलींना पाठबळ दिले आहे. वर्षांपासून ७ अनाथ मुली त्यांनी दत्तक घेतल्या आहेतच; पण यंदा आणखी २ म्हणजे एकूण ९ अनाथ मुली दत्तक घेतल्या आहेत. याबाबत या मुलींच्या शालेय साहित्य, पोशाख, आहार व अन्य साहित्य यांचा चेक बालकल्याण संकुलकडे सुपूर्द केला. याचवेळी मेतके गावातील जिल्हा परिषद शाळेतील घटती पटसंख्या व अपुऱ्या शिक्षक संख्येची दखल घेत संस्थानने आपल्या वतीने ५ शिक्षक येथे नेमले असून, पूर्ण शाळा डिजिटल करून दिली जाणार आहे. बालसंकुलला चेक व शिक्षकांची नियुक्तिपत्रे ट्रस्टचे कार्याध्यक्ष पापा पाटील-कौलवकर, अध्यक्ष राजेंद्र पाटील, सदस्य दयानंद पाटील, बळीराम मगर, देवाप्पा पुजारी, पद्मजा तिवले, बाबासाहेब पाटील, तसेच बालकल्याण संकुलचे अधीक्षक पंडित डवरी, शरयू मोरे, नजीरा नदाफ, अश्विनी आवळे, मोहिनी तोरस्कर आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news