कोल्हापूरची जनता क्षीरसागर यांच्या दादागिरीच्या भाषेला मतातून उत्तर देईल

Maharashtra Assembly Election : आमदार सतेज पाटील
Satej Patil
सतेज पाटीलFile Photo
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : राजेश क्षीरसागर यांची पार्श्वभूमी ही गुंडगिरीचीच आहे. त्यांनी डॉक्टर, बिल्डर यांच्याकडून हप्ते वसुलीसाठी केलेली मारहाण कोल्हापूरची जनता अद्याप विसरलेली नाही. शेजार्‍यांना सुद्धा त्यांनी मारहाण, दडपशाही केली. पण, त्या कुटुंबाने त्यांना चोख उत्तर दिले. कोल्हापूरची जनता क्षीरसागर यांच्या दादागिरीच्या भाषेला मतातून उत्तर देईल, असा पलटवार आमदार सतेज पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला.

क्षीरसागर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला. त्यावर आ. पाटील यांनी प्रसिध्दी पत्रक काढत त्याला उत्तर दिले. आ. पाटील म्हणाले, मतदानाच्या दिवशीसुद्धा क्षीरसागर यांनी टाकाळा येथे दादागिरी करण्याचा प्रयत्न केला. पण, बॉडीगार्डला सोबत घेऊन पैसे वाटणार्‍या क्षीरसागरांना कार्यकर्त्यांनी त्याच भाषेत उत्तर देऊन तिथून पळवून लावले. कसबा बावडा येथे एका निष्ठावंत शिवसैनिकाची क्षीरसागर यांच्या समोरच गळपट्टी धरून धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न त्यांच्या शहरप्रमुखाने केला. त्यामुळे संतप्त झालेल्या निष्ठावंत शिवसैनिकांनी आणि बावड्यातील तरुणांनी क्षीरसागर आणि त्यांच्या कंपूला जाब विचारला. पण, मी संयम ठेवून सामंजस्याने परिस्थिती हाताळून या संतप्त तरुणांना विनंती करून समजावून सांगितले.

मतदानाच्या प्रक्रियेमध्ये कोणताही अडथळा येऊ नये, याची काळजी घेतली. पण, कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा असलेल्या क्षीरसागर यांच्यासारख्या नेत्याने असे प्रकार करणे कितपत योग्य आहे? लोकांचा कल आपल्या विरोधात असल्याचे लक्षात आल्याने क्षीरसागर यांनी दिवसभर हे सर्व प्रयत्न केले. तसेच लोकांनी आपल्या अंगावर यावे आणि त्यातून आपल्याला सहानुभूती मिळावी, असा यामागे त्यांचा हेतू होता का, हा सुद्धा प्रश्न आहे. बावड्यात येऊन त्यांनी राहुल माळी या निष्ठावंत शिवसैनिकाला दादागिरी केली. त्यामुळेच मी या निष्ठावंत शिवसैनिकाच्या पाठीशी ठामपणे राहण्याचा निर्णय घेतला आणि यापुढेही सुद्धा राहणार, असेही पाटील यांनी या पत्रकात म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news