

दानोळी; पुढारी वृत्तसेवा : येथे कोथळी रोडवर आज गुरुवारी रात्री साडेदहाच्या दरम्यान तरस सदृश्य प्राण्याचे दर्शन झाल्याने घबराटीचे वातावरण पसरले आहे. काही शेतकऱ्यांना याचे दर्शन झाल्याने माहिती ग्रामस्थांना देण्यात आली.
सध्या शेतीसाठी रात्रीचा वीजपुरवठा सुरू असल्याने शेतकरी वर्ग रात्री शेतीला पाणी देण्यासाठी शेतावर जातात. पण आज रात्री साडे दहा च्या दरम्यान बाबासाहेब बोरचाटे आणि शुभम बोरचाटे या शेतकऱ्यांना तरस सदृश प्राणी दिसला. त्याचे छायाचित्र ही मोबाईल मध्ये टिपण्यात आले आहे. तरस दिसल्याची माहिती गावात देण्यात आली.
या आगोदर ही येथे तरसाच्या हल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून तरस सदृश्य प्राणी दिसल्याने ग्रामस्थांनी, शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असे आव्हान पोलिस पाटील प्रशांत नेजकर आणि ग्रामपंचायत दानोळी तर्फे करण्यात आले आहे.