Kolhapur Rainfall Deficit | राज्यातील सर्वाधिक पर्जन्यतुटीच्या जिल्ह्यांत कोल्हापूरचा समावेश

नंदूरबार, सोलापूर, लातूरनंतर सर्वाधिक कमी पाऊस; सरासरीच्या केवळ ५१.९ टक्के पाऊस
Kolhapur Rainfall Deficit |
Kolhapur Rainfall Deficit | राज्यातील सर्वाधिक पर्जन्यतुटीच्या जिल्ह्यांत कोल्हापूरचा समावेशFile Photo
Published on: 
Updated on: 

आशिष शिंदे

कोल्हापूर : मुबलक पावसाचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या कोल्हापूरचा यंदा पावसाची सर्वाधिक तूट असलेल्या जिल्ह्यांमध्ये समावेश झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पाण्याचे मोठे संकट उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोल्हापूर हा पावसाचा जिल्हा. मात्र यंदा पावसाचे वितरण इतके लहरी राहिले की, जिल्ह्यात पावसाला सरासरी तर सोडाच; निम्मादेखील बरसता आला नाही. १ जून ते ३० सप्टेंबरदरम्यान जिल्ह्यात सरासरीच्या केवळ ५१.९ टक्के पाऊस झाला आहे. २०१५ नंतर म्हणजेच ११ वर्षांनतर कोल्हापुरात कमी पावसाची नोंद झाली. नंदूरबार, सोलापूर, लातूर नंतर तर कोल्हापुरात कमी पाऊस झाला आहे.

जिल्ह्यातील १२ तालुक्यांचे सरासरी पर्जन्यमान १,७३३.१ मिलिमीटर आहे. त्या तुलनेत यंदा केवळ ८९९ मिलिमीटर पाऊस झाला. सरासरीच्या ८३४.१ मिलिमीटर पावसाची तूट राहिली असून, प्रत्यक्ष पाऊस सरासरीच्या निम्म्यापेक्षा केवळ १.९ टक्के अधिक आहे. २०१५ मध्ये कोल्हापुरात सरासरीच्या केवळ ३६.६ टक्के पाऊस झाला होता. त्यानंतर यंदा पुन्हा पावसाचे प्रमाण मोठ्या तुटीसह राहिले आहे. राज्यातील पावसाच्या तुटीच्या चित्रात कोल्हापूरची स्थिती विशेष लक्षवेधी आहे. नंदूरबारमध्ये सरासरीच्या ४९.६ टक्के, सोलापूरमध्ये ५०.८ टक्के, लातूरमध्ये ५१.४ टक्के, तर कोल्हापूरमध्ये ५१.९ टक्के पाऊस झाला आहे. पाठेपाठ अमरावती (५६.२ टक्के) आणि परभणी (५६.८ टक्के) यांचा क्रमांक लागतो.

* एक जून ते ३० सप्टेंबरदरम्यान जिल्ह्यात ८९९ मि.मी. पाऊस

* तब्बल ८३४.१ मि.मी. कमी पाऊस झाला

* ११ वर्षांनंतर पावसाची मोठी तूट

* २०१५ मध्ये सरासरीच्या ३६.६ टक्के पाऊस झाला होता

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news