kolhapur | अंबाई टँक येथे स्वामींचा पालखी सोहळा उत्साहात

डॉ. योगेश जाधव यांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप
कोल्हापूर : अंबाई टँक येथील जगताप परिवारातर्फे आयोजित स्वामी समर्थांचा पालखी सोहळा दै. ‘पुढारी’ माध्यम समूहाचे चेअरमन डॉ. योगेश जाधव यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी अन्य उपस्थित मान्यवर.
कोल्हापूर : अंबाई टँक येथील जगताप परिवारातर्फे आयोजित स्वामी समर्थांचा पालखी सोहळा दै. ‘पुढारी’ माध्यम समूहाचे चेअरमन डॉ. योगेश जाधव यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी अन्य उपस्थित मान्यवर. ( छाया : पप्पू अत्तार)
Published on
Updated on

कोल्हापूर : अंबाई टँक येथील जगताप परिवारातर्फे आयोजित स्वामी समर्थांचा पालखी सोहळा शुक्रवारी उत्साहात पार पडला. स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम झाले. रात्री दै. ‘पुढारी’ माध्यम समूहाचे चेअरमन डॉ. योगेश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत पालखी सोहळा व महाप्रसादाचे वाटप झाले. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर, भाविक उपस्थित होते.

फुलेवाडी येथील श्री दत्त मंदिर येथून सायंकाळी साडेसहा वाजता स्वामींच्या पालखी सोहळ्यास सुरुवात झाली. पालखी रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आली होती. त्यामागे आकर्षक विद्युत रोषणाई केलेल्या रथामध्ये स्वामी समर्थांची मूर्ती विराजमान होती. पोलिस बँड, घोडे व उंटांचा लवाजमा, हत्ती तसेच तुरंबे (ता. राधानगरी) येथील बाल वारकर्‍यांनी केलेला टाळ-मृदंगाचा गजर व उपस्थित भाविकांनी केलेला अखंड जयघोष अशा उत्साही व भक्तिमय वातावरणात पालखी मार्गस्थ झाली. पुढे दत्त मंदिर मंगल कार्यालय, रोटरी विद्यालय, छत्रपती शिवाजी ग्रुप, रंकाळा तालीम मंडळमार्गे अंबाई टँक येथे आली.

यावेळी प्रमोद जगताप, नगरसेवक शारंगधर देशमुख, राहुल माने, विजय देसाई, रत्नेश शिरोळकर, आश्किन आजरेकर, दीपक वायदंडे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल पालोजी, सुधीर राणे, रोहित पोवार, अभिजित बुडके, अनंत कुलकर्णी, दत्ता रणदिवे, संदीप पाटील, अनिरुद्ध घोडके, धनंजय भुतकर, गणेश पाटील, भगवान पाटील, गौरव पवार, संचित बांदेकर यांच्यासह मोबाईल ग्रुपचे कार्यकर्ते, परिसरातील भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news