Ambabai Temple | अंबाबाईचे सुवर्ण अलंकार लखलखले

रिठा, वाळूच्या नैसर्गिक पद्धतीने स्वच्छता
Ambabai Temple
अंबाबाईचे सुवर्ण अलंकार लखलखले
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : नवरात्रौत्सवाच्या मंगल पर्वासाठी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे सुवर्ण वैभव सज्ज झाले आहे. वर्षभर जपून ठेवण्यात येणार देवीचे मौल्यवान सुवर्ण जडावी अलंकार मंगळवारी पारंपरिक आणि नैसर्गिक पद्धतीने स्वच्छ करण्यात आले. रिठा, वाळू आदींचा वापर करून केलेल्या स्वच्छतेनंतर सोन्याचा किरीट, चंद्रहार, ठुशीपासून शिवकालीन कवड्याच्या माळेपर्यंतचे पारंपरिक अलंकार पुन्हा लखलखले.

मंदिरात तीन-चार दिवसांपासून विविध तयारी सुरू आहे. मंदिराची स्वच्छता अंतिम टप्प्यात आली असून सोमवारी पूजेसाठी वापरण्यात येणाऱ्या चांदीच्या वस्तूंची तर मंगळवारी सुवर्ण अलंकारांची स्वच्छता केली. नवरात्राच्या पहिल्या दिवसापासून दसऱ्यापर्यंत देवीच्या विविध रूपांतील सालंकृत पूजा बांधण्यात येणार असल्याने या अलंकारांना विशेष महत्त्व आहे. सुवर्ण अलंकारांच्या स्वच्छतेसाठी कोणत्याही रासायनिक पदार्थांचा वापर केला नाही. रिठा, वाळू आणि अन्य नैसर्गिक साधनसामग्रीच्या सहाय्याने सुमारे २० ते २२ कर्मचाऱ्यांनी सुरक्षा व्यवस्थेत ही स्वच्छता पूर्ण केली. स्वच्छतेचे काम गजानन कवठेकर, आनंद कवठेकर, संकेत पोवार, उमेश लाड, महेश कढणे, शैलेश इंगवले, उदय लाड, आकाश लाड आणि अंकुश सावंत यांनी केले. विविध सालंकृत पूजांमध्ये देवीला हे अलंकार परिधान करण्यात येणार आहे. ११ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या नवरात्रौत्सवासाठी तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

स्वच्छतेची पारंपरिक पद्धत

सुवर्ण अलंकारांची स्वच्छता करताना रासायनिक पदार्थांचा वापर टाळण्यात आला. रिठा, वाळू आणि अन्य नैसर्गिक साधनसामग्रीच्या सहाय्याने अलंकार स्वच्छ करण्यात आले. पारंपरिक पद्धतीने स्वच्छता करताना अलंकारांची सुरक्षितता आणि त्यांचे ऐतिहासिक स्वरूप जपण्याची काळजी घेण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news