Kolhapur Ambabai Temple| ढगाळ वातावरण नसल्यास किरणोत्सव होणार पूर्ण क्षमतेने

खगोल अभ्यासक डॉ. कारंजकर; दक्षिणायन किरणोत्सवापूर्वीच्या चाचणीतील निष्कर्ष
Kolhapur Ambabai Temple
कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिराच्या दक्षिणायन किरणोत्सवाची चाचणी घेताना खगोल अभ्यासक डॉ. मिलिंद कारंजकर.
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : ढगाळ वातावरण नसल्यास करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात पूर्ण क्षमेतेने किरणोत्सव होईल, अशी माहिती खगोल अभ्यासक डॉ. मिलिंद कारंजकर यांनी दिली. दक्षिणायन किरणोत्सवाच्या दोन दिवस आधी म्हणजेच शनिवारी मंदिरात सूर्यकिरणांची विशेष पूर्वचाचणी घेण्यात आली. सूर्यकिरणे योग्य दिशेने आणि अपेक्षित ठिकाणी प्रवेश करत आहेत की नाही, हे तपासण्यासाठी प्रतिवर्षी ही चाचणी घेतली जाते.

किरणोत्सव चाचणीत सूर्यकिरणांच्या प्रवेश मार्गात झाडे, इमारती किंवा अन्य कोणते अडथळे येत आहेत का, तसेच किरणांची तीव्रता आणि त्यांचा कोन अपेक्षेप्रमाणे आहे का, याचे बारकाईने निरीक्षण करण्यात आले. याशिवाय मंदिराबाहेरील वातावरण, ढगांची स्थिती, धुके, धूळ आणि दृश्यमानता यांचाही अभ्यासही करण्यात आला.

सूर्याची खगोलीय स्थिती, किरणांची दिशा, मंदिराची वास्तुरचना आणि वातावरणातील बदल या सर्व बाबींचा एकत्रित विचार यावेळी करण्यात आला. यामुळे किरणोत्सवाच्या दिवशी सूर्यकिरणांची घटना अपेक्षित वेळेत आणि योग्य प्रकारे घडण्यासाठी आवश्यक परिस्थिती आहे का, याची पूर्वकल्पना आली.­

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.