Ambabai Temple : अंबाबाईच्या चरणी अडीच कोटींचे दान

दोन महिन्यांतील ११ दानपेट्यांची मोजदाद पूर्ण; एका पेटीत सर्वाधिक ५० लाखांची देणगी
ambabai temple
ambabai temple
Published on
Updated on

कोल्हापूर : श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर देवस्थान समितीच्या दानपेट्यांमधील रकमेची ३० जून ते ६ जुलै या कालावधीत दोन महिन्यांतील मोजदाद करण्यात आली. ११ दानपेट्यांमधून एकूण २ कोटी ५७ लाख ११ हजार ४०७ रुपये इतकी देणगी भाविकांकडून जमा झाल्याचे देवस्थान समितीच्या वतीने सांगितले.

गेल्या पाच दिवसांपासून दानपेटीतील देणगीची मोजदाद सुरू होती. त्यामध्ये मदत पेटी क्रमांक १ मध्ये सर्वाधिक ५०,३७,६२८ रुपये देणगीदाखल जमा झाले. ३० जून रोजी पाच दानपेट्यांची मोजदाद करण्यात आली. त्यामध्ये दान पेटी क्रमांक क्रमांक ६ मध्ये २४,८४,५६९ रुपये, क्रमांक १० मध्ये ३,५६,२२७ रुपये, क्रमांक ४ मध्ये २,३०,३२६ रुपये तर क्रमांक ९ मध्ये १,९६,१२५ रुपये जमा झाले. पेटी क्रमांक २ मधून ४८,२०,७०० रुपये आणि क्रमांक ८ मधून ७,९०,९९१ रुपये प्राप्त झाले. पेटी क्रमांक ११ मधून ३६,४५,४४० रुपये जमा झाले. पेटी क्रमांक ७ मध्ये ३०,३९,५४२ रुपये, तर पेटी क्रमांक १२ मध्ये २०,४५,६३३ रुपये, क्रमांक ३ मध्ये १,७७,७७२ रुपये आणि क्रमांक ५ मध्ये ८३,४५० रुपये जमा झाल्याची नोंद आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news