Ambabai Temple : अंबाबाई मंदिर संवर्धन कामाची देखरेख समितीकडून पाहणी

त्रुटींबाबत तक्रारींची पडताळणी; अहवाल लवकरच देणार
Ambabai Temple
Ambabai Temple
Published on
Updated on

कोल्हापूर : अंबाबाई मंदिर विकास आराखडाअंतर्गत पहिल्या टप्प्यातील संवर्धन व जतन कामातील त्रुटींच्या तक्रारींच्या अनुषंगाने जिल्हाप्रशासनाच्या नेतृत्वाखाली नियुक्त करण्यात आलेल्या देखरेख समितीच्या वतीने मंगळवारी मंदिरातील संवर्धन कामाची पाहणी करण्यात आली. यामध्ये मंदिरात सुरू असलेल्या कामासह मणिकर्णिका कुंड, नगारखाना व गरुड मंडपाच्या बांधकामाची पाहणी करण्यात आली.

मंगळवारी दुपारी चार वाजता समितीचे सदस्य तसेच पुरातत्त्व विभागाचे अधिकारी पाहणीसाठी मंदिरात आले. अंबाबाई मंदिरातील मुख्य गाभारा, कासव चौक, गणपती चौक यासह आवारातील ओवऱ्या, अन्य मंदिरांचे दगडी बांधकाम, खांब यांच्या कामाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक विलास वहाणे, स्थानिक तज्ज्ञ अधिकारी अमोल राठोड यांनी संवर्धन कामाबाबत दाखल झालेल्या तक्रारींचे निरसन केले. यावेळी समितीच्या सदस्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा झाली.

पाहणीवेळी समितीचे अध्यक्ष अपर जिल्हाधिकारी अजय पवार, पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक डॉ. विलास वहाणे, अभियंता क्रांतिकुमार मिरजकर, चंद्रशेखर दिघावकर, शशिकांत निंबाळकर, डाॅ. अवनिश पाटील आदी उपस्थित होते.

समिती स्थापनेचा उद्देश

मंदिर विकास आराखड्याअंतर्गत पहिल्या टप्प्यातील कामांमध्ये त्रुटी व नियमबाह्य कामे सुरू असल्याबाबत विविध सामाजिक संघटना तसेच भाविकांकडून तक्रारी व निवेदने देण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर २२ जुलै रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार जिल्हाधिकारी व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष डॉ. विजय राठोड यांनी ही समिती स्थापन केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news