Ambabai Temple : अक्षयतृतीयेला अंबाबाईचा झुल्यावर हिंदोळा

प्रथेनुसार साजरा झाला सोहळा; चैत्रगौरी पाठवणीनिमित्त डाळ पन्ह्यासह आमरसपुरीचा नैवेद्य
Ambabai Temple
अक्षयतृतीयेला अंबाबाईचा झुल्यावर हिंदोळा
Published on
Updated on

कोल्हापूर : फुला-पानांनी सजवलेल्या झोपाळ्यावर अलंकार परिधान केलेली अंबाबाईची उत्सवमूर्ती चैत्रगौरीप्रमाणे झोके घेत आहे. सोबत मंगलवाद्यांचा आवाज आणि दीप-धुपाचा प्रसन्न थाट. कलात्मक रांगोळ्यांची सजावट केली आहे. अशा वातावरणात गरुड मंडपात बांधण्यात आलेल्या झुल्यावर हिंदोळा घेणाऱ्या अंबाबाईचे दर्शन रविवारी हजारो भाविकांनी घेतले.

साडेतीन मुहूर्तांपैकी अक्षयतृतीयेच्या दिवशी रविवारी प्रथेनुसार करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचा हिंदोळा सोहळा भक्तिभावाने साजरा करण्यात आला. यावेळी देवस्थानचे सचिव शिवराज नाईकवाडे, व्यवस्थापक महादेव दिंडे यांच्यासह पुजारी, मानकरी उपस्थित होते. यावेळी श्रीपूजक मंडळाच्या महिलांच्या वतीने हळदी-कुंकू, पन्हे आणि आंबेडाळ वाटप करण्यात आले. रात्री पुन्हा चोपदारांच्या ललकारीने उत्सवमूर्तीचे गर्भगृहाकडे प्रस्थान झाले आणि त्यानंतर शेजारती झाली.

अक्षयतृतीयेला अंबाबाईला आमरसपुरीचा नैवेद्य

वर्षातील साडेतीन मुहूर्तांमध्ये अक्षयतृतीया हा अर्धा मुहूर्त आहे. देव-देवतांच्या पूजनामध्येही या दिवसाला विशेष महत्त्व आहे. अंबाबाई या दिवशी वर्षातून एकदा झुल्यावर बसून हिंदोळ्याचा आनंद घेते. या दिवशी फळांचा राजा असलेल्या आंब्याचे घराघरांमध्ये आगमन होते. हंगामातील पहिला आंबा भोजनात समाविष्ट केला जातो. अंबाबाईसाठीही रविवारी आमरसपुरीच्या नैवेद्याचा मान होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news