Ambabai Temple : अंबाबाईची मूर्ती दर्शनासाठी खुली

विकास प्रकल्पांतर्गत चार दिवसांनी संवर्धन प्रक्रिया पूर्ण
Ambabai Temple
Ambabai Temple
Published on
Updated on

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील गाभाऱ्याची संवर्धन प्रक्रिया पूर्ण झाल्याने चार दिवसांनंतर गाभाऱ्यातील अंबाबाई दर्शन बुधवारपासून खुले करण्यात आले. 14 मार्चपासून गाभारा बंद होता. बुधवारी सकाळी साडेआठ वाजता धार्मिक विधी करण्यात आले. त्यानंतर मूळ मूर्तीचे दर्शन पूर्ववत सुरू करण्यात आले.

अंबाबाई मंदिर विकास आराखड्यांतर्गत पहिल्या टप्प्यातील संवर्धन व जतन विकासकामे गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. यामध्ये मंदिर आवारातील छोटी मंदिरे, शिल्पाकृती, दगडी भिंती यांच्यावर संवर्धनाची प्रक्रिया करण्यात आली होती. 14 मार्च रोजी अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यातील दगडी भिंतीच्या संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले होते, पुरातत्त्व विभागाच्या निरीक्षणानुसार ही प्रक्रिया करण्यात आली. मंगळवारी (17 मार्च) रात्री उशिरा संवर्धनाचे काम झाले. चार दिवसांच्या काळात अंबाबाईचा गाभारा बंद ठेवण्यात आला होता. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी पेटीचौकात कलश व उत्सवमूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. तसेच अभिषेकाचीही सुविधा सुरू होती. दरम्यान, बुधवारी सकाळी साडेआठ वाजता अंबाबाईच्या गाभाऱ्यातील मूळ मूर्तीवर अभिषेक करण्यात आला. विधिवत पूजा करून आरती करण्यात आली. धार्मिक विधी झाल्यानंतर दर्शनासाठी गाभारा खुला करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news