kolhapur Airport | विमानतळ धावपट्टी विस्तारीकरणासाठी ६०० कोटींची तरतूद; दिल्लीचे पथक दाखल

kolhapur Airport |
kolhapur Airport | विमानतळ धावपट्टी विस्तारीकरणासाठी ६०० कोटींची तरतूद; दिल्लीचे पथक दाखलPudhari File Photo
Published on
Updated on

दौलत कांबळे

उजळाईवाडी : कोल्हापूर विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरण प्रकल्पाला आता गती मिळणार आहे. सध्याची १,८९० मीटर लांबीची धावपट्टी २,३०० मीटरपर्यंत वाढविण्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) सुमारे ६०० कोटी रुपयांची तरतूद केली असून, प्रकल्पाच्या पुढील कार्यवाहीसाठी दिल्लीहून तज्ज्ञांचे पथक कोल्हापुरात दाखल झाले आहे.

कोल्हापूर विमानतळाची धावपट्टी पूर्वी १,३७० मीटर लांबीची होती. वर्ष २०२२ मध्ये तिचे विस्तारीकरण करून ती १,८९० मीटरपर्यंत वाढविण्यात आली. आता आणखी ५०० मीटर वाढ करून धावपट्टीची एकूण लांबी २,३०० मीटर करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

या विस्तारीकरणासाठी आवश्यक असलेली ६४ एकर जमीन राज्य शासनाने शेतकऱ्यांकडून संपादित करून विमानतळ प्रशासनाकडे हस्तांतरित केली आहे. यापैकी सुमारे ३२ एकर क्षेत्र धावपट्टी वाढीसाठी प्रत्यक्ष वापरले जाणार आहे. संबंधित जमीन खोलगट असल्याने तेथे मोठ्या प्रमाणात मुरूम भराव टाकून जमिनीचे सपाटीकरण करणे तसेच धावपट्टीचे बांधकाम करणे आवश्यक आहे.

धावपट्टीची लांबी २,३०० मीटर झाल्यानंतर मोठी विमाने कोल्हापूर विमानतळावर उतरू शकतील. त्यामुळे दिल्लीसह देशातील प्रमुख शहरांशी थेट हवाई संपर्क वाढण्यास मदत होणार आहे. औद्योगिक, व्यावसायिक आणि पर्यटनाला यानिमित्ताने चालना मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news