Kolhapur Airport Road | कोल्हापूर विमानतळ मार्ग लवकरच होणार प्रकाशमय; पथदिव्यांच्या रोषणाईचे काम युद्धपातळीवर सुरू

Kolhapur Airport Road | त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून अंधारात असलेल्या या प्रमुख मार्गाला आता प्रकाशाची साथ मिळणार असून हा परिसर उजळून निघणार आहे.
Kolhapur Airport Road
Kolhapur Airport Road
Published on: 
Updated on: 
Summary
  • पथदिव्यांच्या रोषणाईचे काम युद्धपातळीवर सुरू

  • महाऊर्जा विभागाचा उपक्रम

  • सात कोटींच्या काँक्रिटीकरणानंतर आता परिसराचे रूपडे पालटणार; प्रवाशांसह नागरिकांमधून समाधान

उजळाईवाडी : पुढारी वृत्तसेवा
येथील विमानतळ मार्गावर लवकरच पथदिव्यांची आकर्षक रोषणाई होणार असून यामुळे रात्रीच्या वेळी हा संपूर्ण मार्ग लखलखणार आहे. महाऊर्जा (मेडा) विभागाच्या वतीने या मार्गावर पथदिवे बसविण्याचे काम सध्या युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे.

Kolhapur Airport Road
कोल्हापूर : 'तावडे हॉटेल' मार्ग वाहतुकीसाठी बंद, पुलाखाली पाणी आल्याने प्रशासनाचा निर्णय

त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून अंधारात असलेल्या या प्रमुख मार्गाला आता प्रकाशाची साथ मिळणार असून हा परिसर उजळून निघणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुमारे साडेसात कोटी रुपये खर्च करून अवघ्या दोन महिन्यांपूर्वी या मार्गाचे काँक्रिटीकरण करण्यात आले होते. यामुळे रस्त्याचे रूपडे आधीच पालटले होते. आता त्यात पथदिव्यांची भर पडणार असल्याने परिसराचे सौंदर्य वाढणार आहे.

सध्या पथदिवे बसवण्यासाठी खड्डे खणण्याचे व इतर तांत्रिक कामे प्रगतीपथावर आहेत. विमानतळ मार्गावर रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात अंधार राहत असल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांना ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत होती. याशिवाय, अंधाराचा फायदा घेऊन चोऱ्या व अनुचित प्रकार घडल्याच्या तक्रारीही यापूर्वी समोर आल्या होत्या.

Kolhapur Airport Road
Mobile Dispute Murder| मोबाईल लवकर परत दिला नाही म्हणून खून

पथदिवे कार्यान्वित झाल्यानंतर अशा घटनांना मोठा आळा बसेल आणि रात्रीची वाहतूक अधिक सुरक्षित होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विमानतळाकडे ये-जा करणाऱ्या प्रवासी, नागरिक आणि स्थानिक रहिवाशांना या पथदिव्यांमुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

रस्त्याच्या दुतर्फा होणाऱ्या प्रकाशझोतामुळे विमानतळ परिसराचे रात्रीचे दृश्य आणखी खुलून दिसणार असून शहराच्या या महत्त्वाच्या प्रवेशमार्गाला एक वेगळे व आकर्षक स्वरूप प्राप्त होणार आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news