

कोल्हापूर ः शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनवरील एअर व्हॉल्व्हला शिंगणापूरजवळ गळती लागल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. त्यामुळे पाणीपुरवठा बंद करावा लागला. यानंतरच एअर व्हॉल्व्हची गळती थांबली.
दरम्यान, बुधवारी थेट पाईपलाईनचा पाणीपुरवठा सुरू होणार असल्याने पाणीपुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही, असे पाणीपुरवठा विभागाने सांगितले. शिंगणापूरजवळच्या एअर व्हॉल्व्हमधून कांरजासारखे पाण्याचे फवारे उडू लागले. काही नागरिकांनी ही माहिती महापालिकेला दिल्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. त्यानंतर या पाईपलाईनमधील पाण्याचा पुरवठा बंद केला. त्यानंतर ही गळती थांबली.