Kolhapur Accident : शिरढोणमध्ये काळजाचा ठोका चुकला! धावत्या दुचाकीवर कोसळले झाड; तरुण गंभीर जखमी

Kolhapur Accident : शिरढोणमध्ये काळजाचा ठोका चुकला! धावत्या दुचाकीवर कोसळले झाड; तरुण गंभीर जखमी
Published on
Updated on

शिरढोण : शिरढोण (ता. शिरोळ) येथे स्वाद हॉटेल जवळ दुचाकीवरून जात असताना एका तरुणावर अचानक झाड कोसळून तो गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी (दि. २) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात विजय कोपार्डे (रा. शहापूर) या तरुणाच्या डोक्याला व हाताला दुखापत झाली असून दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे. केवळ दैव बलवत्तर म्हणून मोठा अनर्थ टळला.

घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. प्रसंगावधान राखत सामाजिक कार्यकर्ते विश्वास बालीघाटे व अविनाश पाटील यांनी तत्काळ धाव घेऊन जखमी तरुणाला रस्त्याच्या कडेला सुरक्षित स्थळी हलवले. त्यांच्या तत्परतेमुळे पुढील धोका टळला.

दरम्यान, या ठिकाणी इचलकरंजी महानगरपालिकेच्या कृष्णा योजनेअंतर्गत पाइपलाईनचे काम सुरू आहे. रस्त्यालगत खोदकाम करताना झाडांच्या मुळांना इजा होत असून अनेक झाडे असुरक्षित बनली आहेत. याबाबत नागरिकांनी संबंधित ठेकेदाराला वारंवार सूचना दिल्या होत्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

या घटनेनंतर कामातील निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून तातडीने पाइपलाईनचे काम पूर्ण करून योग्य खबरदारी घ्यावी, अन्यथा काम बंद करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news