Kolhapur Accident : भरधाव एसटीची टेम्पोला धडक; एक ठार, दोघे जखमी

कूर-गारगोटी रस्त्यावरील घटना
Kolhapur Accident
भरधाव एसटीची टेम्पोला धडक; एक ठार, दोघे जखमी
Published on
Updated on

गारगोटी : कूर नजीक सोमवारी रात्री 10 वाजता झालेल्या अपघातात रामचंद्र मारुती मोरे (वय 54, रा. कूर) यांचा मृत्यू झाला.

मोरे हे जेवणानंतर फिरण्यासाठी बाहेर गेले होते. कूर-गारगोटी रस्त्यावर कडेला उभे असताना बिद्रीकडून गारगोटीच्या दिशेने जाणाऱ्या दूध टेम्पोला (एमएच 11 एजी 7200) मागून येणाऱ्या एसटी बसने (एमएच-09 एफएल 8138) धडक दिली. टेम्पो रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मोरे यांना धडकला आणि पुढे जाऊन उभ्या ट्रकला (क्र.एमएच 10 ए 9950) धडकला. या अपघातात मोरे यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, टेम्पो चालक राजाराम मारुती भांडवलकर (42, रा. मुरुक्टे) व वासुदेव पांडुरंग बोंगार्डे (40, रा. बारवे) जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी एसटी चालक सचिन काकासो नाईक (47, रा. शेणगाव, ता. भुदरगड) याच्यावर भुदरगड पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news