Kolhapur Accident : दुचाकी अपघातात शिरगावचा तरुण ठार

कोपार्डे वळणावरील घटना
Kolhapur Accident
दुचाकी अपघातात शिरगावचा तरुण ठार
Published on
Updated on

विशाळगड : कोपार्डे वळणावर सोमवारी रात्री उशिरा झालेल्या दुचाकी अपघातात शिरगाव (ता. शाहूवाडी) येथील किरण भगवान पोतदार (वय 34) या तरुणाचा मृत्यू झाला. दोन दुचाकींच्या धडकेत दुसऱ्या दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कोल्हापूर येथे उपचार सुरू आहेत.

ऐन यात्रेच्या काळात गावातील तरुण मुलाचा अंत झाल्याने शिरगावसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची नोंद शाहुवाडी पोलिसांत झाली आहे. किरण पोतदार दुचाकीवरून रात्री शिरगावकडे जात होता. त्याचवेळी शिरगावकडून मलकापूरच्या दिशेने दुसरी दुचाकी येत होती. कोपार्डे येथील धोकादायक वळणावर दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली. किरणच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच प्राण गेला. किरण पोतदार हा नोकरीनिमित्त कुटुंबासह कोल्हापूर येथे स्थायिक होता. ग््राामदैवताची यात्रा असल्याने पाच-सहा दिवसांपूर्वीच तो गावी आला होता. यात्रेच्या आनंदी वातावरणात अचानक काळाने घाला घातला. त्याच्या मागे पत्नी, आई व तीन वर्षांचा मुलगा असा परिवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news