Kolhapur accident news | रेडिमिक्सर ट्रकची दुचाकीला जोराची धडक! महिला जागीच ठार, तर एकजण गंभीर जखमी

अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती
accident
accidentfile photo
Published on
Updated on

नागाव : पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर टोप (ता. हातकणंगले) ग्रामपंचायतीसमोर बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास भरधाव रेडिमिक्सर ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील महिला जागीच ठार झाली, तर एकजण गंभीर जखमी झाला. मयत महिला ही नवे पारगाव गावची असून ती लिफ्ट घेवून कोल्हापूरच्या दिशेने जात असताना हा अपघात होऊन तीचा या अपघातात मृत्यू झाला .

accident
Murder Mystery | प्रेमाचा करुण अंत की पैशांची हाव? प्रेयसी आणि तिच्या मुलाच्या मृत्यूची अंगावर काटा आणणारी कहाणी

पोलिसातून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी कि मयत महिलेचे नाव वैशाली संजय माने ( वय ४० रा. नवे पारगाव ता. हातकणंगले ) असे आहे. ही महिला टोप-पेठवडगाव रस्त्यावरील संभापूर गावच्या चिन्मय फाट्यावर कोल्हापूरला जाण्यासाठी वाहनाची वाट पाहत उभी होती. त्याचवेळी भुये ता. करवीर येथील सचिन सुंदर कांबळे हा आपल्या मोटारसायकल (क्र. एम एच ०९ डी क्यू ७९०१) ने पेठवडगावहून कोल्हापूरच्या दिशेने जात होता. त्यावेळी वैशालीने त्यांच्याकडे लिफ्ट मागितली.

accident
Vadgaon knife attack : वडगाव चाकू हल्ल्यातील जखमी करणचा मृत्यू; अज्ञातांकडून आरोपीचे घर खाक, तिघांना बेड्या

दोघेही टोप ग्रामपंचायतीसमोरील उतारावरून जात असताना, पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या रेडीमिक्सर ट्रक ( क्र. एम एच 48 टी 8705) ने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोघेही रस्त्यावर पडले. दुर्दैवाने वैशाली यांच्या डोक्यास जोरदार मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीस्वार कांबळे याच्या पायावरून चाक गेल्याने ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. जखमी कांबळे यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news