Kolhapur Crime : झोपेतून उठून लघुशंकेला गेला अन् चिमुरड्यावर काळाचा घाला

एसएससी बोर्ड परिसरातील दुर्दैवी घटना
Accidental Death
Accidental Deathfile pudhari photo
Published on
Updated on

कोल्हापूर : आई-वडील दोनवेळच्या भाकरीसाठी बांधकामावर मोलमजुरी करायचे... परिस्थिती जेमतेम असल्याने आपल्या आठ वर्षांच्या चिमुकल्या बादलची त्यांना सतत काळजी वाटायची. त्यामुळे त्यांनी बादलला आत्याकडे ठेवले होते. आत्याच्या दोन मुलांसोबत मायेच्या सावलीत तोही आनंदाने वाढत होता. मात्र एका काळरात्रीने बादलचा जीवच घेतला. रात्री झोपेत असताना लघुशंकेसाठी उठलेला बादल गॅलरीतून खाली पडला आणि जीवाला मुकला. बादलचा मृतदेह पाहून जन्मदात्यांनी फोडलेला हंबरडा काळीज हेलावणारा होता.

बादल भागडा डवर (८, मूळ रा. मध्य प्रदेश, सध्या रा. सायबर चौक) असे या दुर्दैवी बालकाचे नाव आहे. रविवारी (दि. ९) रात्री १२ च्या सुमारास ही घटना घडली होती. या घटनेची नोंद राजारामपुरी पोलिस ठाण्यात झाली. मूळचे मध्य प्रदेश येथील भागडा ध्यानसिंग डवर हे बांधकाम कामगार असून ते पत्नी व मुलासह सायबर चौक येथे भाड्याच्या खोलीत राहतात. एस.एस.सी. बोर्डनजीक अलंककृत रेसिडेन्सीमध्ये एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी मोलमजुरी करून ते उदरनिर्वाह करतात. याच बांधकामावर त्यांची बहीण व तिचे पती वॉचमन म्हणून आहेत. त्यांच्या घरात ही दुर्घटना घडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news