कोल्हापुरात उद्या ‘केएमए कॉन’ वैद्यकीय परिषद

डॉ. शकील मोमीन यांना ‘डॉ. अतुल जोगळेकर जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर
'KMA Con' medical conference tomorrow in Kolhapur
कोल्हापुरात उद्या ‘केएमए कॉन’ वैद्यकीय परिषद. Pudhari File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूर मेडिकल असोसिएशन शाखा इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने ‘केएमए कॉन 2024’ या वैद्यकीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. हॉटेल सयाजी येथे शनिवार ( दि. 19 ) व रविवार ( दि. 20 ) अशी दोन दिवस ही परिषद चालणार आहे. ‘डॉक्टर बियोंड मेडिसिन 360’ हे परिषदेचे ब्रिदवाक्य आहे.

दरम्यान, यंदाचा डॉ. अतुल जोगळेकर जीवनगौरव पुरस्कार डॉ. शकील मोमीन यांना देण्यात येणार असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अमोल कोडोलीकर, परिषदेचे चेअरमन डॉ. दीपक जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शनिवारी सायंकाळी 6 वाजता परिषदेचे उद्घाटन भारतीय लष्कराचे निवृत्त माजी प्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या हस्ते होणार आहे. दोन दिवस चालणार्‍या या परिषदेमध्ये वैद्यकीय व नैसर्गिक द़ृष्टिकोनांसह विविध जीवन पद्धतींचे ज्ञान एकत्रित करून आरोग्य, रोग या दैनंदिन आव्हानांना डॉक्टरांनी कसे सामोरे जायचे, यावर विशेष चर्चा होणार आहे. परिषदेत राष्ट्रीय स्तरावरील ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये आर्टिफिशियन इंटेलिजन्स, वजन नियंत्रण, मेडिटेशन, वैद्यकीय सेवेतील कायदेशीर तरतुदी, डॉक्टरांकरिता आर्थिक नियोजन या विषयांचा समावेश आहे. पत्रकार बैठकीला असोसिएशनचे सचिव डॉ. शीतल देसाई, डॉ. सरोज शिंदे, डॉ. अर्चना पवार, डॉ. प्रवीण नाईक, डॉ. आशा जाधव, डॉ. स्नेहलदत्त खाडे, डॉ. आर. एम. कुलकर्णी, डॉ. ए. बी. पाटील, डॉ. महावीर मिठारी, डॉ. सूर्यकांत मस्कर, डॉ. कृष्णा केळवकर, डॉ. अभिजित तगारे, डॉ. शुभांगी पार्टे, डॉ. प्रवीण वडगावे, डॉ. अश्विनी पाटील उपस्थित होते.

अवयवदान जनजागृतीसाठी रविवारी रॅली

पश्चिम महाराष्ट्रासह कोकण विभागातील सुमारे पाचशे डॉक्टर परिषदेस उपस्थित राहणार आहेत. अवयवदान जनजागृतीसाठी रविवारी सकाळी साडेसहा वाजता हॉटेल सयाजी ते शिवाजी विद्यापीठ या मार्गावर रॅली काढण्यात येणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news