High-Profile Prostitution Racket |हायप्रोफाईल वेश्या व्यवसाय प्रकरणी म्होरक्याला अटक

High-Profile Prostitution Racket |
High-Profile Prostitution Racket |हायप्रोफाईल वेश्या व्यवसाय प्रकरणी म्होरक्याला अटक
Published on
Updated on

कोल्हापूर : व्हॉटस्ॲपद्वारे हायप्रोफाईल वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या शहाजी एकनाथ वैद्य ऊर्फ सागर पाटील (रा. हेदवडे, ता. भुदरगड) याला रविवारी (दि. २) करवीर पोलिसांनी अटक केली. सागर पाटील फ्रेंडस्‌ सर्कल नावाने ग्रुप करून त्याने जिल्ह्यातील विविध लॉजवर वेश्या व्यवसाय सुरू केल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

करवीर पोलिसांनी शनिवार, दि. ११ जुलै रोजी वाशी (ता. करवीर) येथील सनराईज लॉजवर छापा टाकून हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला होता. सागर पाटील नावाने व्हॉटस्ॲ‌पवर ग्रुप तयार करून वेश्या व्यवसाय सुरू होता. याप्रकरणी करवीर पोलिसांनी तीन कामगार, दोन लॉजमालकांसह पाच जणांना यापूर्वी अटक केली. गुन्हा दाखल झाल्यापासून सागर पाटील पसार झाला होता. रविवारी सकाळी तो जीवबा नाना जाधव पार्क येथे येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना मिळाली होती. यानुसार पोलीस अमलदार विजय तळसकर, रणजित पाटील, श्रीधर जाधव, अविनाश कांबळे यांनी सापळा रचून सागरला अटक केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news