Keshavrao Bhosale Natyagruha | ३० जुलैची डेडलाईन गाठण्यासाठी ‘केशवराव’च्या कामाला वेग

सुशोभीकरणासह स्वच्छतेची कामेही अंतिम टप्प्यात; ९ ऑगस्टला होणार लोकार्पण
Keshavrao Bhosale Natyagruha
Keshavrao Bhosale Natyagruha | ३० जुलैची डेडलाईन गाठण्यासाठी ‘केशवराव’च्या कामाला वेग
Published on
Updated on

कोल्हापूर : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत पाऊल टाकताच कानावर सर्वप्रथम पडतोय तो मशिनचा आवाज... कुठे ड्रिल सुरू आहे, कुठे रंगाचा शेवटचा हात दिला जातोय, तर कुठे कामगार शिडीवर उभे राहून प्रकाशयंत्रणेची जोडणी करत आहेत. सभागृहात खुर्च्या बसवण्याचे काम सुरू आहे. छताची बांधणी केली जात आहे. संपूर्ण नाट्यगृहात एकच लगबग... एकच ध्यास... ३० जुलैपर्यंत काम पूर्ण करण्याचा.

कोल्हापूर : नाट्यगृहातील प्रकाशयोजनेची जोडणी करताना.
कोल्हापूर : नाट्यगृहातील प्रकाशयोजनेची जोडणी करताना.

८ ऑगस्ट २०२४ रोजी नाट्यगृहाला आग लागल्यानंतर गेल्या दीड वर्षापासून पुनर्बांधणीचे काम सुरू आहे. यासाठी राज्य शासनाने २५ कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. २९ जून रोजी झालेल्या आढावा बैठकीत संबंधित बांधकाम कंपनीने येत्या ३० जुलैपर्यंत सर्व काम पूर्ण होईल, असा दावा केला होता. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. २०) नाट्यगृहाची प्रत्यक्ष पाहणी केली असता, तो दावा पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असल्याचे चित्र दिसून ले. प्रत्येक विभागात कामगारांची धावपळ सुरू असून, अंतिम हात फिरवला जात आहे.

कोल्हापूर : सभागृहाच्या भिंतीचे काम सुरू असताना.
कोल्हापूर : सभागृहाच्या भिंतीचे काम सुरू असताना.

स्टेज उभारणी झाली असून खुर्चीची फिटिंग तपासली जात आहे. अत्याधुनिक प्रकाशयंत्रणा, ध्वनियंत्रणेची जोडणी आणि उपकरणांची उभारणी सुरू आहे. मेकअप रूम, स्वच्छतागृहे, ग्रीनरूम, कॉरिडॉर आणि इतर सुविधा पूर्ण झाल्या आहेत. बाह्य परिसरात पेव्हर ब्लॉक, सुशोभीकरण आणि स्वच्छतेची कामेही अंतिम टप्प्यात आली आहेत. संपूर्ण परिसराला नवे, आकर्षक रूप देण्याचे काम सुरू आहे.

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात चाचणी

नियोजनानुसार काम पूर्ण करण्यासाठी आता अवघे दहा दिवस शिल्लक आहेत. त्यानंतर ध्वनिव्यवस्था, प्रकाशयोजना, विद्युत प्रणाली, रंगमंचावरील यंत्रणा आणि अन्य तांत्रिक सुविधांची चाचणी घेतली जाणार आहे. या सर्व चाचण्या यशस्वी झाल्यानंतर नाट्यगृह लोकार्पणासाठी सज्ज होईल.

कोल्हापूर : छताच्या फिनिशिंगवर अखेरचा हात.
कोल्हापूर : छताच्या फिनिशिंगवर अखेरचा हात. (सर्व छाया : पप्पू अत्तार)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news