केशवराव नाट्यगृहाच्या भिंती मजबूतच

जसेच्या तसे उभे करण्याच्या हालचालींना गती
Keshavrao theater
केशवराव नाट्यगृहाच्या भिंती मजबूतचPudhari File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : केशवराव भोसले नाट्यगृह पुन्हा जसेच्या तसे उभे करण्याच्या हालचालींना गती आली आहे. नाट्यगृह जसेच्या तसे होणार हे स्ट्रक्टवेल डिझायनर्सच्या सादरीकरणातून स्पष्ट झाले. हेरिटेज-1 मध्ये ही इमारत येत असल्याने दगडाच्या बदल्यात दगड, स्टीलच्या बदल्यात स्टील आणि लाकडाच्या बदल्यात लाकडाचेच काम होणार असून मूळ ढाच्यामध्ये कोणताही बदल होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कामाचा दर्जा आणि नाट्यगृहाच्या सुरक्षा लक्षात घेऊन जादाच्या सुविधा निर्माण होणार आहेत.

स्ट्रक्टवेल डिझायनर्स प्रा. लिमिटेड या कंपनीकडे स्ट्रक्चरल ऑडिटचे काम दिले होते. हे बहुतांशी काम पूर्ण झाले आहे. यामध्ये नाट्यगृहाच्या भिंतींना 115 वर्षे होऊनही व आगीसारखी दुर्घटना घडूनही या इमारतीच्या भिंती मजबूतच असल्याचे स्ट्रक्टरवेल कंपनीचे चेअरमन चेतन रायकर यांनी सादरीकरणादरम्यान सांगून या मूळ ढाच्यामध्ये कोणताही बदल होणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे केवळ भिंतींची देखभाल दुरुस्ती करावी लागणार आहे. तसेच नाट्यगृहातील आसन क्षमता 744 वरून 800 पर्यंत जाऊ शकेल. खुर्च्यांच्या रचनेत बदल होतील, असेही स्पष्ट केले. तसेच पार्किंगसाठी मोठी स्पेस येथे निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. बाजूच्या जागा महापालिकेने ताब्यात दिली तर ते शक्य असून तेथे पार्किंगसाठी बांधकाम होईल. त्यामध्ये 160 चारचाकी आणि 288 दुचाकी वाहने पार्क होणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे पार्किंग आणि पेंढारकर दालनासाठी बांधण्यात येणार्‍या इमारतीवर सोलर सिस्टीम बसविण्यात येणार असल्याने भविष्यात विजेचा खर्च वाचणार आहे.

इमारत गळणार नाही

स्ट्रक्चरवेलचे चेअरमन चेतन रायकर म्हणाले, हेरिटेज-1 दर्जाच्या देशभरातील अनेक इमारतींची आम्ही डागडुजी केली आहे. त्यामुळे मोठ्या आत्मविश्वासाने आम्ही हे काम घेणार असून पुढच्या 25 वर्षांत या इमारतीच्या छतालाही गळती लागणार नाही. याची दक्षता आम्ही घेऊ. इमारतीचे बांधकाम चांगले आहे. भिंती मजबूत आहेत. केवळ एक-दोन मीटरने भिंती उतरून डागडुजी केली, नियमित देखभाल, दुरुस्ती केली तर या इमारतीला पुढच्या काही वर्षांत धक्काही लागणार नाही.

अशा मिळणार सुविधा :

* सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे

* रिस्क मॅनेजमेंट सिस्टीम

* फायर सेफ्टीची तरतूद

* प्रवेशद्वाराची पुनर्रचना

* पार्किंगसाठी प्रशस्त जागा मिळणार

* स्वच्छतागृहे, कँन्टीन, रूमची सुविधा

सौरऊर्जेची व्यवस्था

केली जाणार

ठिणगी पडली तर पाण्याच्या फवार्‍याने विझणार

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news