दुबई, अबुधाबी सहलीच्या अभूतपूर्व यशानंतर ‘कस्तुरी’ निघाल्या थायलंडला!

कस्तुरी क्लब, ‘अ हेवन हॉलिडे’च्या संयुक्त विद्यमाने थायलंड, बँकॉक, पटाया लेडीज स्पेशल सहलीचे आयोजन
kasturi-club-and-a-heaven-holiday-organise-thailand-bangkok-pattaya-ladies-special-tour
दुबई : दुबई-अबुधाबी आंतरराष्ट्रीय सहल कस्तुरी सभासदांसाठी अविस्मरणीय अनुभव देणारी ठरली तो क्षण.pudhari File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबमार्फत महिलांसाठी आयोजित करण्यात येणार्‍या विविध सहलींमध्ये महिलांचा सहभाग दरवर्षी वाढत आहे. नुकत्याच झालेली दुबई-अबुधाबी आंतरराष्ट्रीय सहल कस्तुरी सभासदांसाठी अविस्मरणीय अनुभव देणारी ठरली.

मागील सहलीत, महिलांनी दुबईतील उंच इमारती, सुंदर स्थळे, पार्ट्या आणि राईडस्चा मनमुराद आनंद घेतला. निवास व्यवस्था, भारतीय पद्धतीचे भोजन आणि प्रवासाचे चोख नियोजन, यामुळे ही सहल अत्यंत आरामदायी झाली. घरकाम करणार्‍या सामान्य महिलांपासून ते नोकरी करणार्‍यांपर्यंत अनेक महिलांचे परदेश प्रवासाचे स्वप्न कस्तुरी क्लबने पूर्ण केले, ज्यामुळे त्यांना नवी उमेद आणि आयुष्यभराच्या सुखद आठवणी मिळाल्या. या अभूतपूर्व यशानंतर, आता दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबच्या महिला सदस्यांसाठी थेट थायलंडची आंतरराष्ट्रीय सफर अ हेवन हॉलिडेजसोबत आयोजित केली आहे! लेडीज स्पेशल आंतरराष्ट्रीय बँकॉक-पटाया सहलीचे (4 रात्री, 5 दिवस) लवकरच आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी बुकिंग आवश्यक आहे.

अनुभवा थायलंडची अविस्मरणीय सफर

कस्तुरी क्लबच्या या थायलंड सहलीमध्ये महिलांना सुरक्षितपणे फिरण्याचा अनुभव घेता येणार आहे. पटाया येथील चकचकीत रस्ते, अल्काझार शोची नेत्रदीपक कलाकारी आणि समुद्राच्या मधोमध असलेल्या कोरल आयलंडचे सौंदर्य महिलांना मोहात पाडेल. सफारी वर्ल्डमध्ये डॉल्फिन आणि सी लायनचे रोमांचक शो पाहून मन प्रसन्न होईल. तसेच, नुंगनुच व्हिलेजमधील सांस्कृतिक कार्यक्रम आणि एलिफंट शो खास आकर्षण ठरतील. चार तारांकित हॉटेलमध्ये मुक्काम, भारतीय पद्धतीचे जेवण आणि मराठी मॅनेजरची सोय असल्यामुळे महिलांना घरच्यासारखा आराम मिळेल आणि या सहलीचा अविस्मरणीय आनंद लुटता येईल.

समाविष्ट बाबी : कस्तुरी ऑफिस ते विमानतळ/विमानतळ ते कस्तुरी ऑफिस बस प्रवास, विमान तिकीट, 4 तारांकित हॉटेलमध्ये मुक्काम (दोन व्यक्तींमध्ये एक रूम), ब—ेकफास्ट, लंच, डिनर, भारतीय जेवण, आयटनरीप्रमाणे प्रवेश फी आणि मराठी सहल मॅनेजर यांचा समावेश आहे.

अधिक माहितीसाठी ः

कोल्हापूर - 9923617769, गडहिंग्लज - 9423539561, इचलकरंजी - 9890978109 व 8805007724, 9423824997 या क्रमांकांवर संपर्क साधावा.

तुमच्या स्वप्नातील प्रवासाला पंख : ‘अ हेवन हॉलिडे’

‘अ हेवन हॉलिडे’ म्हणजे केवळ प्रवास नव्हे, तर अविस्मरणीय अनुभवांची हमी! एका सामान्य कुटुंबातून आलेल्या संस्थापक राजेंद्र बुगडे यांनी अनेक वर्षांच्या खडतर संघर्षानंतर ग्राहकांचा विश्वास जपला आहे. अतिशय छोट्या प्रमाणात सुरुवात करून त्यांनी ‘अ हेवन हॉलिडे’ला यशाच्या शिखरावर नेले. ‘अ हेवन हॉलिडे’ या टूर अँड ट्रॅव्हल्स कंपनीने मध्यमवर्गीय पर्यटकांना केंद्रस्थानी ठेवून व्यवसायाची दिशा निश्चित केली आहे. या कंपनीचे मुख्य उद्दिष्ट मध्यमवर्गीय बजेटमध्ये आंतरराष्ट्रीय पर्यटनाचा अनुभव उपलब्ध करून देणे हे आहे.

दुबई, सिंगापूर, मलेशिया, थायलंड तसेच युरोपसारख्या आकर्षक पर्यटन स्थळांसाठी ते विशेष टूर आयोजित करतात. कंपनी उत्कृष्ट सेवा आणि परवडणारे दर या दोन स्तंभांवर उभी आहे, ज्यामुळे त्यांना पर्यटन क्षेत्रात विश्वास आणि गुणवत्तेच्या जोरावर ग्राहकांच्या मनात विश्वासाचे स्थान प्राप्त केले आहे. ‘अ हेवन हॉलिडे’ ग्राहकांना भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय सहली कमी खर्चात उपलब्ध करते. असे असले तरी गुणवत्तेमध्ये कोणतीही तडजोड केली जात नाही. प्रत्येक ग्राहकाला वैयक्तिक लक्ष देणे आणि संपूर्ण प्रवासात सुरक्षिततेची हमी देणे, हे त्यांच्या सेवेचे वैशिष्ट्य आहे. राजेंद्र बुगडे व कुटुंबीयांनी या व्यवसायाच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना कौटुंबिक आणि विश्वासार्ह सुरक्षित प्रवासाचा अनुभव मिळाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news