Gokul election | ‘गोकुळ’च्या रणधुमाळीत करवीर ठरणार ‘किंगमेकर’

सर्वाधिक संस्थांमुळे तालुक्याकडे लक्ष!
Gokul election |
Gokul election | ‘गोकुळ’च्या रणधुमाळीत करवीर ठरणार ‘किंगमेकर’
Published on
Updated on

पवन मोहिते

कसबा बावडा : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत करवीर तालुका निर्णायक भूमिका बजावणार आहे. सर्वाधिक दूध उत्पादक संस्था करवीरमध्ये असल्याने यंदाच्या निवडणुकीचे राजकीय गणित मोठ्या प्रमाणात या तालुक्याभोवती फिरताना दिसत आहे.

निवडणुकीसाठी गोकुळकडून सहायक निबंधक कार्यालयाकडे 5,470 संस्था सभासदांची यादी सादर केली आहे. यात सर्वाधिक 868 संस्था करवीर तालुक्यातून आहेत. त्यामुळे गोकुळच्या सत्तासंघर्षात करवीरची भूमिका ‘किंगमेकर’ ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. सन 2021 मध्ये झालेल्या गोकुळ निवडणुकीसाठी 3,659 संस्था मतदानासाठी पात्र ठरल्या होत्या, यात करवीर मधील 642 संस्थांचा समावेश होता.

या निवडणुकीत करवीर तालुक्यातून सात संचालक निवडून आले होते. त्यामुळे करवीरचा मतदानाचा कल संपूर्ण सत्तासमीकरण बदलण्याची ताकद ठेवतो, हे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. दरम्यान 1,108 आवसायनातील संस्थांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली होती, त्यांची सुनावणी सध्या सहा. निबंधक दुग्ध यांच्या कार्यालयात अंतिम टप्प्यात आहे. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर मतदानासाठी पात्र संस्थांची अंतिम आकडेवारी निश्चित होणार आहे. करवीरमधील संस्थांचे मतदान कोणाच्या पारड्यात जाणार यावरच गोकुळची सत्ता अवलंबून राहणार असल्याने आता महायुती आणि आघाडीने करवीरवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news