शाहूवाडीतील कानसा नदीवरील कांडवण धरण भरले

शाहूवाडीतील कानसा नदीवरील कांडवण धरण भरले
Kandwan Dam on Kansa river in Shahuwadi filled up
शाहूवाडीतील कानसा नदीवरील कांडवण धरण भरलेPudhari Photo

बांबवडे : पुढारी वृत्तसेवा

शाहूवाडी तालुक्यातील कानसा नदीवर असलेले दीड टीएमसीचे कांडवण धरण पूर्ण क्षमतेने भरले. धरणाच्या सांडव्यावरून पाणी नदी पात्रात पडत आहे. जिल्‍ह्यातील हे पहिलेच धरण आहे जे यंदाच्या पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने भरलेले आहे.

Kandwan Dam on Kansa river in Shahuwadi filled up
कोल्‍हापूर : राजाराम बंधाऱ्यावर पाणी; पातळी १७ फुटांवर

कानसा खोऱ्यातील उदगिरी घाटमाथ्यावर पावसाचे प्रमाण ज्यादा आहे. त्‍यामुळे दोनच दिवसात हे धरण भरले आहे. कानसा खोऱ्यातील कांडवण, मालगांव, जांबूर विरळे, पळसवडे, थावडे सोंडोली या गावांच्या पिण्यासाठी आणि शेतीपिकांसाठी या नदीतून पाणी पुरवठा केला जातो. हे धरण पूर्ण क्षमतेने भरल्‍याने येथील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news