Graduate Constituency Election | कागल तालुक्यात पदवीधरसाठी उच्चांकी ६६.९२ टक्के मतदान

खर्डेकर चौक, निपाणी वेस परिसराला जत्रेचे स्वरूप; महायुतीच्या कार्यकर्त्यांची दिवसभर धावपळ
Graduate Constituency Election |
Graduate Constituency Election | कागल तालुक्यात पदवीधरसाठी उच्चांकी ६६.९२ टक्के मतदान
Published on: 
Updated on: 

कागल : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी कागल तालुक्यातील सर्व मतदान केंद्रांवर उत्साहात मतदान झाले. सकाळी मतदारांच्या केंद्राबाहेर रांगा लागलेल्या होत्या. शहरातील खर्डेकर चौक व निपाणी वेस परिसराला या निवडणुकीमुळे जत्रेचे स्वरूप आले होते.

कागल तालुक्यात एकूण ६६.९२ टक्के इतके उच्चांकी मतदान झाले. राज्यात उच्चांकी मतदानाची परंपरा कागल तालुक्याने या निवडणुकीत देखील कायम राखली. महायुतीच्या सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांनी उत्‍स्फूर्त सहभाग घेतला. विशेष करून राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ मतदान केंद्राबाहेर दुपारपर्यंत तळ ठोकून होते. तर जिल्हा बँकेचे संचालक भैया माने हेदेखील दिवसभर मतदारांचा टक्का वाढवण्यासाठी प्रत्येक मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करीत होते. महायुतीचे सर्वच प्रमुख कार्यकर्ते मतदान करून घेण्यासाठी दिवसभर धावपळ करीत होते.

यावेळी शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे, गोकुळचे संचालक अंबरिष घाटगे, भारतीय जनता पक्षाचे समन्वयक सारंग धुरी यांनीही भेटी दिल्या. दरम्यान, दुपारी दोनच्या दरम्यान पदवीधर उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांनी शहरातील सर्व मतदान केंद्रांवर भेट देऊन मतदानाची पाहणी केली. तसेच मतदारांनाही त्‍या भेटल्या. विशेषकरून त्यांनी मतदान केंद्रावर काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. यावेळी मतदारांनी त्यांच्याबरोबर सेल्फी काढून शुभेच्छा दिल्या.

अपंग, गर्भवती मतदारही मतदानासाठी उत्स्फूर्तपणे येत होते. तसेच आपल्या तान्ह्या बाळालादेखील घेऊन माता आलेल्या होत्या. उत्साही कार्यकर्त्यांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत जादा टक्केवारीने मतदान झाल्याचे समजताच खर्डेकर चौकामध्ये फटाक्यांची आतषबाजी करून आनंद व्यक्त केला. तसेच डॉ. स्मिता जाधव, मंत्री हसन मुश्रीफ आणि भैया माने यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या. यावेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले, महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव या दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या सूनबाई आहेत. डी. वाय. पाटील यांच्या त्या नात आहेत. पदवीधर मतदारसंघातून पहिल्या महिला आमदार होण्याचा विक्रम करणार आहेत. कोल्हापूरच्या अस्मिता म्हणून त्या प्रचंड मतांनी विजयी होतील.

भैया माने म्हणाले, या निवडणुकीत मतदारांमध्ये प्रचंड उत्साह आहे. महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव विजयी होतील. डॉ. स्मिता जाधव म्हणाल्या, कागल येथील कार्यकर्त्यांनी चांगलं काम केले आहे. कष्ट घेतले आहे, त्याचे फळ चांगलेच मिळेल. मतदान करण्याकरिता सर्व मतदार बाहेर पडले. लोकशाही उत्सवामध्ये सहभागी झाले. यावेळी नगरसेवक प्रवीण काळबर, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, राजेंद्र जाधव, बंडा बारड, अरुण गुरव, उपनगराध्यक्ष जयवंत रावण, रणजित बाबा पाटील, दीपक मगर, अमित पिस्टे, बिपिन माने, सुनील माने, रमेश माळी, बाळासो माळी, संजय चितारी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news