Kagal Honey Bee Attack : कागलमध्ये मधमाश्यांचा हल्ला; 11 जण जखमी

शाहू उद्यान परिसरातील घटना
Honey  Bee Attack News
Honey Bee Attack News
Published on
Updated on

कागल : शहरातील शाहू उद्यान परिसरात झाडावर असलेल्या मधाच्या पोळ्याला क्रिकेटचा चेंडू लागल्याने आक्रमक झालेल्या मधमाश्यांच्या हल्ल्यात 11 जण जखमी झाले. ही घटना गुरुवारी घडली.

जखमींमध्ये सुशीला रामचंद्र कचाडे (65), निखिल नामदेव कांबळे (23), सुधाकर नामदेव कांबळे (52), महेंद्र मच्छिंद्र पवार (37), शुभम कांबळे (29), स्वप्निल शंकर कांबळे (40), शांताबाई दिनकर गोंधळी (65), सागर मधुकर कोदवडे (45), अश्विनी अनिल काळे (48) आणि विराज अनिल काळे (22) यांचा समावेश असून, त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे; तर दिनकर शंकर गोंधळी (70) व नारायण भीमराव कांबळे (50) यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. जखमींना तातडीने कागल येथील ग््राामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, शाहू उद्यानात मोठ्या प्रमाणात झाडे असून वाऱ्यामुळे झाडे एकमेकांवर घासल्यानेही मधमाशा आक्रमक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महिनाभरापूर्वीही अशाच प्रकारची घटना घडली होती. त्यामुळे उद्यानातील झाडांची नियमित देखभाल करून मधमाशांची पोळी होऊ नयेत यासाठी प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news